बीड एसटी महामंडळाकडून नियंत्रण कक्ष स्थापन
बीड | वार्ताहर
लॉकडाउनमुळे राज्याच्या विविध भागात अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या मूळ गावी परतण्यासाठी वाहतूक सुविधेची माहिती देण्यासाठी बीड एसटी महामंडळाकडून नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाने संबंधित प्रवासी नागरिकांना त्यांच्या मूळगावी पाठवण्याची रितसर परवानगी दिल्यानंतर संबंधित प्रवासी जिल्ह्यातील आठही आगार प्रमुखांची संपर्क करून गावी जाण्यासाठी बस उपलब्ध करून घेऊ शकतात अशी माहिती विभाग नियंत्रक कालिदास लांडगे यांनी दिली.
कोरणा विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने 23 मार्चपासून लॉकडाउन जाहीर केला आहे; परिणामी शिक्षण, नोकरीनिमित्त गेलेले अनेक नागरिक राज्याच्या विविध भागात अडकून पडले आहेत. दरम्यान शासनाने त्या नागरिकांना त्यांच्या मूळगावी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.अशावेळी नागरिकांना गावी जाताना कोणतीही अडचण येऊ नये त्यांना वाहतूक सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एसटी महामंडळाने नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. बीड जिल्ह्यातील आठही आगाराचे नियंत्रण कक्षातील संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे:-
विभाग नियंत्रक कालिदास लांडगे मो. ९४२२६५७५९३, विभागीय वाहतूक अधिकारी हर्षद बन्सोडे मो. ९४२२६५५३५३, बीड आगार प्रमुख निलेश पवार मो. ८२७५९२६०११, परळी आगार प्रमुख रंजित राजपुत ७५८८८१४४५१, आगार प्रमुख धारूर शंकर स्वामी ७९७२६९६८८०, आगार प्रमुख माजलगाव दत्ता काळम ९८३४७६३९५१, आगार प्रमुख गेवराई अविनाश वाघदरीकर ७०५८८४८२४९, पाटोदा आगार प्रमुख एस. बी. पडवळ ९५२७८८२९६९, आगार प्रमुख आष्टी संतोष डोके ९७६४७१९२५९ व आगार प्रमुख अंबाजोगाई नवनाथ चौरे ९७६५३३८१९०, तसेच नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्र. (०२४४२ २२२५८२) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन एसटी विभाग नियंत्रकांनी केले आहे.
Leave a comment