मौलाली बाबा दर्गा परिसरात शुकशुकाट
आष्टी । वार्ताहर
- दरवर्षी वैशाख पौर्णिमेला भरणारी कडा येथील मौलाली बाबा रद्द करण्यात आली . त्यामुळे गुरुवारी ( दि ७ ) मौलाली बाबा दर्गा परिसरात शुकशुकाट दिसत होता.
कडा गावचे ग्रामदैवत असलेला मौलाली बाबाचा दर्गा हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक आहे . दरवर्षी वैशाख पौर्णिमेला भरणारी यात्रा किमान आठवडाभर चालते . आष्टी तालुकाच नव्हे तर दूरवरून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात . यंदा मात्र कोरोनामुळे यात्रा रद्द करण्यात आली . त्यामुळे यात्रेचा दिवस असलेल्या पौर्णिमेच्या दिवशी दर्गा परिसरात शुकशुकाट होता . काही भाविक पायरीपासून दर्शन घेऊन परतत होते . यात्रा निमित्ताने येणारे पाळणे , विविध दुकाने नसल्याने परिसर ही निवांत होता . छबिना मिरवणूक ही रद्द झाली . यात्रेच्या दुसऱ्या दिवशी भरणारा कुस्ती आखाडा ही झाला नाही . त्यामुळे कुस्तीगीर आणि कुस्ती प्रेमी देखील नाराज झाले.
Leave a comment