आष्टी : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात गत 45 दिवसापासून लॉकडाऊन असल्याने अनेकजण अडकून पडले होते.परंतु प्रशासनाने अडकलेल्या लोकांना गावी जाण्यास परवानगी दिली आहे.आष्टी मध्ये मध्यप्रदेशातील कामासाठी आलेले 12 मजूर अडकून पडले होते. त्यांना शुक्रवारी गावाकडे रवाना करण्यात आले. हे सर्व मजूर औरंगाबाद मार्गे मध्यप्रदेशात पोहचणार आहेत.प्रशासनाच्या वतीने तहसीलदार नीलिमा थेऊरकर, पोलीस निरीक्षक माधव सूर्यवंशी यांनी सर्व प्रवाशांना निरोप देण्यात आला.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment