धारुर । वार्ताहर
शहरात नगर परिषद प्रशासनाने गुरुवारी (दि.7) केलेल्या फेर बॅरिकेटींगमुळे रुग्णवाहिका, गॅस वितरण, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणार्या वाहनांना अडथळा निर्माण झाला असून गर्दी रोकण्याच्या प्रयत्नात इतर अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
शहरात पंधरा दिवसांपुर्वी नगर परिषदेच्या वतीने मुख्य बाजारपेठ व बाजार तळाला जोडणार्या रस्त्यावर अडथळे टाकण्यात आली होती.यामुळे बाजारात होणार्या गर्दीला आळा बसेल असा अंदाज होता.मात्र या उपायानंतरही गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात स्थानिक प्रशासनाला यश येत नसल्याचे दिसुन आले. दुचाकी वाहनासह, हातगाडे व इतर चारचाकी वाहनाचा बंदोबस्त करण्यासाठी पुर्वीच्या बरिकेटिंग आणखी वाढवून रस्त्यावरची वाहतूकच बंद करण्यात आली. यामुळे मुख्य रस्त्यावरुन रुग्णवाहिका, गॅस वितरण, व दुकानात जीवनावश्यक वस्तू पुरवठा करणार्या वाहनांना मोठा अडथळा निर्माण झाला आहे. याबाबतीत प्रशासनाने फेर विचार करावा अशी मागणी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आशोक जाधव यांनी केली आहे.
Leave a comment