गेवराई । वार्ताहर
कोरोना सारख्या गंभीर आजाराला रोखण्यासाठी जनतेच्या हिताची काळजी घ्यायची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे, तिन्ही उपविभाग पोलीस ठाणे प्रमुखांनी दक्ष राहावे, असे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी येथे बोलताना दिले आहेत. गुरुवारी ता. 7 रोजी नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक विजय कबाडे, उपविभागीय अधिकारी स्वप्निल राठोड, पोनि पुरुषोत्तम चोबे, यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचार्यांची उपस्थिती होती. यावेळी गेवराई पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या हस्ते रोहीदास वामन सूतार, चंद्रकांत एकनाथ सरोदे, शेख यास्मिन शेख बक्सु, अनिता सदाशिव औसरमल, नागेश आसाराम पंडित या पाच कुटुंबाना किराणा कीटचे वाटप करण्यात आले. येथील पोलीस क्वार्टरची पहाणी करून, पोलीस कर्मचार्यांशी त्यांनी सुसंवाद साधला. नपच्या सभागृहात पार पडलेल्या बैठकीत गेवराई, तलवडा व चकलांबा पोलिस ठाणे प्रमुखांशी संवाद साधला व तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेऊन, शासनाच्या वतीने दिलेल्या आदेशाचे पालन कसे केले जाते. त्यात काही अडचणी, तक्रारी आहेत का, अशी विचारणा पोलिस अधिक्षक पोद्दार यांनी पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना केली आहे. पोलिस कर्मचार्यांना काही अडचण, समस्या, असल्यास तातडीने संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले आहे. बैठकीत यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक विजय कबाडे, उपविभागीय अधिकारी स्वप्निल राठोड, पोनि पुरुषोत्तम चोबे, यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचार्यांची उपस्थिती होती. यावेळी गेवराई पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस अधीक्षक पोद्दार यांच्या हस्ते शहरातील गरीब कुंटूबातील रोहीदास वामन सूतार, चंद्रकांत एकनाथ सरोदे, शेख यास्मिन शेख बक्सु ,अनिता सदाशिव औसरमल, नागेश आसाराम पंडित यांना किराणा कीटचे वाटप करण्यात आले. पोलिस अधिक्षकांनी पोलीस क्वार्टरची पहाणी करून, पोलीस कर्मचार्यांशी संवाद ही साधला. यावेळी पो. उपनिरीक्षक तडवी, संदिप काळे, युवराज टाकसाळ, जोगदंड, ऐटवार अण्णा, सपोनि विजय देशमुख, ऊनवने, पोलिस कर्मचारी खटाने, वाघमारे यांच्या सह पोलिस कर्मचार्यांची उपस्थिती होती.
Leave a comment