40 हजारांहून अधिक कुटुंबांना घरपोच दिले किराणा किट
अन्न-धान्यासह भाजीपालाही केला मोफत वाटप
परळी । वार्ताहर
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या परळी मतदारसंघात गोरगरीब - गरजू नागरिकांना त्यांच्या नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेमार्फत लॉकडाऊनच्या पहिल्या आठवड्यापासून मदतीचा यज्ञ सुरू केला असून, आतापर्यंत 40 हजारांहून अधिक कुटुंबांना मोफत किराणा किट वाटप केले आहेत.या किटमध्ये तांदूळ, डाळ, तेल, मीठ, साखर, हळद, तिखट, मसाला आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.
या कठीण काळात अनेक लहान मोठे उद्योग-व्यवसाय ठप्प असून हातावर पोट असलेल्या नागरिकांपुढे उपासमारीचे संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत धनंजय मुंडे यांनी मतदारसंघातील एकही व्यक्ती उपाशी राहू नये या उद्देशाने मोठे मदतकार्य उभारले आहे. 40 हजार किराणा किट सह जवळपास 10 लाख रुपयांचा भाजीपाला शेतकर्यांकडून विकत घेत नागरिकांना मोफत वाटप करून मुंडेंनी दुहेरी दिलासा दिला आहे. तसेच रेशनकार्ड नसलेल्या अनेक नागरिकांना गहू, तांदूळ आदी धान्याचे मोठ्या प्रमाणात वाटप केले जात आहे.
लॉकडाऊनच्या दुसर्या टप्प्याच्या शेवटापर्यंत परळी शहरातील प्रभाग 1 मध्ये 1000 किट, प्रभाग 2 मध्ये 1500 किट व 15 क्विंटल तांदूळ, 3 मध्ये 1500 किट, 4 मध्ये 1500 किट, 5 मध्ये 1300 किट, 6 मध्ये 1000 किट, 7 मध्ये 1700 किट, 8 मध्ये 1700 किट, 9 मध्ये 1500 किट, 10 मध्ये 1000 किट, 11 मध्ये 800 किट, 12 मध्ये, 1000 किट, 13 मध्ये 1000 किट, 14 मध्ये 1000 किट, 15 मध्ये 1000 किट आणि प्रभाग 16 मध्ये 1500 किट वाटप केल्या आहेत. ग्रामीण भागातील सिरसाळ्यात 2000 किट वाटप केल्या आहेत तर नागापूर 500, टोकवाडी 1000, कण्हेरवाडी 1100, घाटनांदूर 1000 किट व 15 क्विंटल गहू, पिंपळा 500 किट, धारावती तांडा व ग्रुप ग्रामपंचायत मध्ये 600 किट, जिरेवाडी 600, सायगाव 250, सातेफळ 250, सुगाव 125, तडोळा 75, अंबासाखर 75, वाघळा 125, मूडेगाव 75, वाघबेट 370, पिंपरी 300, गाडेपिंपळगाव 500, नंदागौळ 925, नांदगाव 125, नांदगाव तांडा 125, भारज 125, सेलूअंबा 125, राडी 350, गिरवली 200, पोखरी 125, अकोला 125, लिंबगाव 125, लिंबगाव तांडा 125, राडी तांडा 125, वाघळा राडी 50, धानोरा बुद्रुक 125, जवळगाव 1000 बरदापुर 500, तर पट्टीवडगाव येथे 400 कुटुंबांना या किटचे वाटप करण्यात आले आहे. नाथ प्रतिष्ठानने देणगी स्वरूपात मिळालेला 130 क्विंटल गहू, 100 क्विंटल तांदूळ मोफत वाटप केले असून परळी येथील अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे सुरू असलेल्या अन्नछत्रसाठी 21 दिवस पुरेल या हिशोबाने 21 क्विंटल गहू, 17 क्विंटल तांदूळ, 3.5 क्विंटल तूरडाळ आणि 21 तेलाचे डबे मोफत दिले आहेत. त्याचबरोबर दवाखान्यामध्ये काम करणार्या ब्रदर्स, सफाई कामगार आदी 500 व्यक्तींना, नगर परिषदेच्या 500 स्वछता कर्मचार्यांना, 400 विट भट्टी मजुरांना, हातगाडी - रिक्षा चालवणार्या 200 व्यक्तींना, हमाल 300, केशकर्तन व्यवसायतील 100 तसेच वृत्तपत्र वितरण करणार्या 100 हून अधिक व्यक्तींना या किराणा किट मोफत दिल्या आहेत.
Leave a comment