माजलगाव:
शहरात पेट्रोल पंप बंद असल्याचा गैरफायदा काही समाज कंटक घेत असून शहरातील गल्ली बोळात तसेच पुनर्वसन व केसापुरी कॅम्प परिसरात 120 ते 150 रु दराने पेट्रोल विक्री करून पेट्रोल चा काळा बाजार सध्या जोरात सुरू आहे
सध्या सकाळी 7 ते 9.30या वेळातच पेट्रोल पंप सुरू असून केवळ इ पास व अत्यावश्यक सेवा ना च पेट्रोल दिले जात आहे.अनेकाना इ पास काढते वेळी तांत्रिक समस्या ना सामोरे जावे लागल्यामुळे त्यांना पेट्रोल पंप वर पेट्रोल दिल्या जात नाही मात्र अत्यावश्यक सेवेत असून मर्यादित वेळेत सेवा देणे भाग असल्यामुळे ते चढ्या भावात मिळेल तेथून पेट्रोल घेत आहेत तर काही इ पास धारक अतिरिक्त पेट्रोल वाहनात भरून घेऊन तेच पेट्रोल गरजवंताला बेभाव विकत असल्याचा प्रकार घडत आहे. अनेक दूध विक्रेत्यां ना तांत्रिक समस्या मुळे इ पास मिळण्यास अडचण आली असून ग्रामीण भागातून येऊन शहरात सकाळी दूध घालणे आवश्यक आहे मात्र पंपावर पेट्रोल मिळत नसल्यामुळे जिथे मिळेल तिथे मिळेल त्या भावात पेट्रोल घेत असल्याचे दूध विक्रेते सांगत आहेत.
शहरातील भीमनगर,आझाद नगर,इंदिरा नगर तसेच चिंच गव्हाण ,केसापुरी कॅम्प,खानापूर आदी भागात असलेल्या लहान टपरी तसेच किराणा व्यावसायिक 120 रु ते 150 रु दराने पेट्रोल विकत असल्याचे सर्व सामान्य बोलत आहेत.सरकारी खात्यातील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्गा कडून इ पास चा गैरवापर पेट्रोल च्या व्यवहारा करिता होत असल्याची चर्चा वाहनधारक करताना दिसून येत आहे.
Leave a comment