आष्टी । वार्ताहर
कोरोना सारख्या महामारीचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रशासन रात्रंदिवस काम करीत आहे. विनापरवाना जिल्हा प्रवेश बंदी असतानाही आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथे बाहेरगावी असलेले सहा कामगार खुसकिच्या मार्गाने व चेकपोस्ट चुकवुन विनापरवाना आणि कसलीही वैद्यकीय तपासणी न करता गावात आल्याने त्यांच्यावर आष्टी पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथील सहा हमाल श्रीरामपुर येथील अशोकनगर सहकारी साखर कारखान्यावर हमाली करण्यासाठी गेले होते. परत गांवी येताना त्यांनी त्या कारखान्याची रितशीर परवानगी घेतली नाही तसेच वैद्यकीय तपासणी केली नाही. आणि टाकळी गावाकडे येताना सर्व चेकपोस्ट चुकवुन खुसकिच्या मार्गाने गावात प्रवेश करुन घरात कुटुंबासमवेत राहु लागले. याप्रकरणी जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन करुन बीड जिल्ह्यात प्रवेश केला. गावातील इतर लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते या कारणांमुळे ग्रामसेविका नाईक यांच्या फिर्यादीवरून टाकळी अमिया येथील शेंडगे वस्ती वरील सहा जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकुश तुकाराम शेंडगे, बजरंग तुकाराम शेंडगे, सोमीनाथ साहेबराव शेंडगे, लक्ष्मण साहेबराव शेंडगे, ज्ञानेश्वर अश्रुबा शेंडगे व परमेश्वर पांढरे यांचा यामध्ये समावेश आहे. यांच्यावर कलम 188, 269,270 भादंवी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो कां बाबासाहेब गर्जे करत आहेत.
Leave a comment