बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यातून बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसात पाठवलेले सर्वच 55 स्वॅबचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. बुधवारचे 4 तसेच गुरुवारी सकाळी 43 आणि दुपारी अंबाजोगाईतील 8 असे अशा 55 स्वॅब अहवालांचा यात समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली.
बुधवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षातून 11 तर केज उपजिल्हा रुग्णालयातून 1 असे एकुण 12 स्वॅब प्रयोगशाळेत तपासणीला पाठवण्यात आले होते. त्यातील 8 जणांचे अहवाल बुधवारी रात्री उशिरा प्राप्त झाले होते. ते सर्व कोेरोना निगेटिव्ह होते. उर्वरित 4 अहवालांची प्रतीक्षा होती. ते अहवालही गुरुवारी सायंकाळी 4.45 वाजता जिल्हा आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाले. सर्व चारही अहवाल निगेटिव्ह आले, त्यानंतर अंबाजोगाईतील 8 स्वॅब अहवालांसह गुरुवारी सकाळी पाठवलेले 43 असे एकुण 55 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान परजिल्ह्यातून आलेले व होम क्वारंटाईनमध्ये असलेल्या व्यक्तींची संख्या 92 इतकी असून 119 जण संस्थात्मक अलगीकरणात आहेत. गुरुवारी सायंकाळपर्यंत 44 हजार 362 ऊसतोड मजुरांनी बीड जिल्ह्यात प्रवेश केल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली.
Leave a comment