केज । वार्ताहर
केज तालुक्यातील नांदुरघाट या गावाने सध्याच्या परस्थितीत मदतीचा हात गरिबांच्या झोपडीपर्यंत पोहोचवण्याचे मोठे काम उभे केले. चार टीम आपल्या आपल्या माध्यमातून गरिबांसाठी मदत घेऊन धाावत आहेत. विशेषतः कुठल्याही पाठबळाशिवाय मित्रांच्या सहभागाने श्रीराम प्रतिष्ठानचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. येथेच अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता तीनशे गरिबांना मदत करीत एक नवा आदर्शही नांदूरघाटने लोकांना दिला आहे. येथील पत्रकारांनी मदतीचे मोठे काम केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच व्यवसाय लॉकडाऊन झाल्याने अनेकावर मोठे संकट उभे राहिले विशेषता हातावर पोट असणार्या गरिबांना तर याचा मोठा फटका बसला. या वेदना जाणत मदतीसाठी अनेक हात धावले. नांदूर या गावात मदतीचा यज्ञ सुरू झाला तो गावापुरता मर्यादित न ठेवता परिसरातील अनेक गावातील गरजूंसाठी उपयोगात आणण्याचे मोठे काम येथील युवकांनी वेगवेगळ्या माध्यमातून उभे केले. यामध्ये वर्गमित्र असणार्या श्रीराम प्रतिष्ठानने बाहेर नोकरी करणार्या मित्रांची मदत घेऊन या कार्याला वेगळी ओळख दिली आतापर्यंत वीस दिवसात जवळपास तीनशे गरजू कुटुंबापर्यंत या प्रतिष्ठानने किराणा सामान पोहोच केले. अशाच मदतीचा काला या गावात अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने होणारे अन्नदान वेगळ्या स्वरूपात काम बंद, दाम बंद अशा गरजू तीनशे कुटुंबापर्यंत शिधा किट देत मदतीचा हरिनाम साजरा केला. याशिवाय येथील पत्रकार श्रीकांत राजे जाधव हेही आपल्या सहकार्यांच्या मदतीने गरजू कुटुंबापर्यंत मोठी मदत पोहोच करताहेत याच बरोबर पत्रकार अमोल जाधव यांचे मदतीचे कार्य कौतुकास्पद आहे. नांदुर घाटच्या युवकांचे मदतीचे प्रेरणादायी काम अनेक गावासाठी दिशादर्शक ठरते आहे.
Leave a comment