बीड । वार्ताहर
लॉकडाऊनमुळे गेल्या दीड महिन्यांपासून बीड जिल्ह्यात अडकून पडलेल्या नागरिकांना स्वतःचे चारचाकी वाहन नसल्याने पास मिळत नाही. त्यामुळे स्वतःचे वाहन नसलेल्या नागरिकांना परतीचा मार्ग कधी मोकळा होणार असा सवाल अडकलेले नागरिक करत आहेत.
कोरोना विषाणूच्या संसंर्गाने लागू झालेल्या लॉकडाऊन मुळे अनेक नागरिक, प्रवासी कामानिमित्ताने आपल्या घरापासून इतर जिल्ह्यात अडकून पडले आहेत. त्यांना आपल्या घरी येण्यास परवानगी काढण्यासाठी ऑनलाईन अर्जाचे संकेतस्थळ सुरू केले आहे. परंतु स्वतःचे वाहन असलेल्यांनाच आपल्या घरी येण्यास परवानगी दिली जात आहे. स्वतःचे वाहन नसलेल्यांना प्रवासाची परवानगी दिल्या जात नाही. तसेच लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी दुचाकीचा पास सुद्धा दिल्या जात नाही. त्यामुळे नागरिक बीड जिल्ह्यात अडकून पडले आहेत. त्यांना आपल्या घरी परत जाण्यासाठी कोणतेही व्यवस्था नाही.किरायाचे वाहन करायला जावे तर पुन्हा चालकाला 24 दिवस क्वारंटाईन करण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे चालक यायला तयार होत नाहीत. बीड जिल्ह्यात अडकून पडलेल्या नागरिकांना घरी जाणे अवश्यक नसल्याचे चित्र यामुळे पहावयास मिळत आहे. पाससाठी ऑनलाईन प्रयत्न करावा तर दुचाकीवर प्रवासाची परवानगी मिळत नाही. संचारबंदी, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा आणि जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाचे उल्लंघन झाले की गुन्हा दाखल करण्यात येतो. त्यामुळे अनेकांची अडचण झाली आहे. त्यांना आपल्या गावी, स्वतःच्या जिल्ह्यात जाण्यास अजून किती दिवस वाट बघत रहावे लागणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Leave a comment