बीड | वार्ताहर

जिल्ह्यात सध्या अनेक घरामध्ये मुला मुलीचे विवाह करण्याची लगबग चालु आहे .परंतु लॉकडाऊन मुळे विवाह समारंभ पारंपारीक पध्दतीने विवाह करताना प्रतिबंधात्मक तरतूदीचे उल्लंघन झाल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो .सबब अशा वधु वरांसाठी नोंदणीकृत विवाह हा एक चांगला पर्याय आहे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

विशेष विवाह कायदा १९५४ अन्वये विवाह नोदणीसाठी लागणारी आवयक कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत.  वधु व वर यांचा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला , पक्षकार अशिक्षित असेल किंवा जन्माची नोंद कोठेही नसेल तर जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडील वैद्यकीय दाखला वधु चे वय १८ वर्ष व वराचे वय २१ वर्ष पुर्णअसणे आवश्यक आहे. तसेच वधु व वर यांचा रहिवाशी पुरावा उदा स्वतच्या नावाचे विज देयक /दुरध्वणी देयक मिळकत कर पावती लिव्ह अॅण्ड लायसन्सची प्रत. वधु किंवा वर घटस्फोटीत असल्यास घटस्फोटासंबधीतचा कोर्ट हुकुमनामा (डिक्री) वधु हि विधवा किंवा वर हा विधुर असल्यास पुर्वीच्या जोडीदाराचा सक्षम प्राधिकारी यांचे कडील मृत्युचा दाखला.  आवश्यक तीन साक्षीदारांची ओळखपत्रे व रहिवास पुरावा सर्व पुरावे साक्षांकीत केलेले असावेत . विशेष विवाहची नोटीस देते वेळी वधु  व वरा पैकी किमान एक पक्षकार विवाह अधिका-याच्या कार्यक्षेत्रात नोटीसच्या दिनांका पासुन मागील सलग ३० दिवस वास्तव्य करीत असला पाहीजे .

विशेष विवाह पध्दतीने विवाह नोंदवितांना वधु-वर खालील अटी व शतीची पुर्तता करणे आवश्यक आहे .
१.विवाह इच्छुक वधु वरापैकी कोणीही मंदबुध्दी किंवा मनोविकृत नसावेत.
२.विवाह इच्छुक वधु वरा पैकी कोणासही वारंवार वेडयाचे झटके , मिरगी, फोट येत नसावेत.
३.विवाह इच्छुक वधु वरा पैकी कोणीही संतती उत्पत्ती करण्यास अपात्र नसावेत
विशेष विवाह कायदा १९५४ अन्वये लावण्यात येणार विवाह हा या विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in
या संकेत स्थळावर नोंदणी विवाह सेवा या सदराखाली ऑनलाईन विवाह नोंदणीचा अर्ज  सादर करता येईल. विवाह नोटीस दिल्यानंतर विवाहाची नोटीस ३० दिवसात कोणताही आक्षेप प्राप्त न झाल्यास किंवा प्राप्त आक्षेपामध्ये तथ्यांश दिसन न आल्यास नोटीस दिलेल्या दिनांका पासून विवाह अधिकारी ३० दिवस ते ९० दिवसापर्यंत कधीही अर्जदाराच्या सोई प्रमाणे वधु व वर व तीन साक्षीदार यांना कार्यालयात येऊनच विवाह संपन्न करु शकतात.

काही अडचणी आल्यास विवाह नोंदणी अधिकारी एस.ए,पोकळे सह दुय्यम निबंधक वर्ग २ तथा विवाह अधिकारी बीड क्र. १ हे असुन यांचा मोबाईल नंबर ९४२१२७३९००व ९६०४५७९९९९ येथे संपर्क साधावा . वरील सर्व तरतुदी पहाता कमीत कमी लोकांसह विवाह करायचा असेल तर यापेक्षा चांगला दुसरा मार्ग नाही .सध्या लोकडाऊनच्या स्थितीमध्ये नागरीकांनी पारंपारीक पध्दतीने विवाह करण्याचा आग्रह न धरता कसलीही गर्दी न करता सर्व नातेवाईकांचे आरोग्य सांभाळून आणि विवाहावर होणार खर्च आणि कर्जाचा डोंगर टाळून कायदेशीर पध्दतीने विवाह करावा आणि सर्व लोकप्रतिनिधीना आणि सर्वसमाजाच्या संघटक आणि वडीलधा-या व्यक्तीना व जनमानसास समजावून सांगून या मागांचे अनुकरण करण्यास प्रवृत्त करावे असे ही आवाहन करण्यात येत आहे .  अन्यथा उदभवणा-या फौजदारी कार्यवाही पासून वाचावे आणि प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
----- 

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.