सीईओ अजित कुंभार यांची माहिती
बीड | वार्ताहर
जिल्हा परिषद अंतर्गत १७ एप्रिलनंतर बीड जिल्हयात परतलेल्या ऊसतोड मजूर कुटूंबाना जीवनावश्यक वस्तू व धान्यादी मालाचे कीट पुरवण्याच्या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात दि.५ मे पर्यत गाव हद्दीत प्रवेश केलेल्या एकुण ६९५ ग्रामपंचायतमधील १० हजार ९८ कुटूंबासाठी धान्य कीट खरेदी करण्यासाठीचा निधी जिल्हा परिषदेमार्फत सर्व पंचायत समितीना वर्ग करण्यात आला. या निधीतुन एकूण १२ वस्तुंच्या कीटची ग्रामपंचायतीकडुन खरेदी करुन येत्या दोन दिवसांत या सर्व कुंटूबाना वाटप पुर्ण करण्यात येईल अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली आहे.
सदर वाटप सुरळीतपणे पार पाडणेसाठी एकुण २३५ संनियंत्रण अधिकाऱ्याची नेमणुक करण्यात आली असून योजनेअंतर्गत गरजू व पात्र कुटुंबाना याचा लाभ होणेसाठी सात सदस्यीय समितीची गावपातळीवर स्थापना करुन या समिती मार्फत संनियत्रण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कीटचे
वाटप होईल.जिल्हास्तरावर तालुकानिहाय देखरेख करणेसाठी प्रत्येकी एक अशा ११ वर्ग -१ अधिकाऱ्याची नेमणूक केल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या शिवाजीराव सिरसाठ व मुख्य कार्यकारीअधिकारी अजित कुंभार यांनी दिली. पंचायत समित्यांनी हा निधी तात्काळ ग्रामपंचायतीना वर्ग करावा व ग्रामपंचायतीनी पुढील दोन दिवसात सर्व पात्र कुंटंबाना अन्नधान्य कीटचे वाटप करण्याबाबतच्या सुचना दिल्याचे जि.प. अध्यक्षा शिवकन्या सिरसाट, व मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी सांगितले. याबाबत काही अडचण वा तक्रार असल्यास पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्याशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
Leave a comment