चार वर्षाच्या भक्तीचा व्हिडीओ कॉल वर कोरोना निर्मूलन सेवेत असणाऱ्या आई ला सवाल .
पेशाने शिक्षक असणारे भक्ती मेहेत्रे चे आई वडील कोरोनाच्या निर्मूलन सेवेत
आष्टी : रघुनाथ कर्डीले
चार वर्षाची मुलगी भक्ती ... आईचे पानंवलेले डोळे त्या माझ्या मुलीचे बोललले शब्द आई तु का रडते हा प्रसंग ना भुतो ना भविष्यती..पण तिने पुर्ण पणे केलेला निश्चय मला जायचं माझा पण खारिचा वाटा या आपत्ती मध्ये देशसेवेसाठी कुठेतरी आला पाहिजे म्हणून पुणे येथून रेड झोन मध्ये कोरोना निर्मूलनाच्या संघर्ष लढाईत उतरलेली ती आई .आपल्या मुलीला व्हिडिओ कॉल करते मुलगी परत तेच पाणावलेले डोळे पाहुन पुन्हा प्रश्न विचारते आई तु का रडते ? जिवना मध्ये आलेला प्रसंग आष्टी तालुक्यातील कडा येथील भक्ती सुनील मेहेत्रे या चार वर्षाच्या चिमुरड्या मुलीसमोर उभा राहिला असून भक्तीचे आई-वडील दोघेही पेशाने शिक्षक असताना दोघांने ही स्वतः कोरूना चा लढाई स्वतःला झोकून दिले आहे.
आष्टी तालुक्यातील कऱ्हेवाडी येथील एका खासगी शाळेमध्ये सुनील मेहेत्रे हे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत, तर पत्नी पुनम सुनिल मेहेत्रे या पुणे महानगरपालिकेतील मनपा शाळा क्रमांक 90 चंदन नगर येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.पुण्यातील कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्यांना 25 एप्रिल रोजी आपत्ती व्यवस्थापन मध्ये ऑर्डर मिळाली होती. जगभर कोरोनाने थैमान घातलेले आहे . पुणे जिल्ह्यातही झपाट्याने प्रादुर्भाव झाला असून पुणे सध्या रेड झोन मध्ये आहे, मात्र स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना वर मात करण्यासाठी पुणे महानगरपालिका अंतर्गत येथील सर्व प्रशासकीय अधिकारी वैद्यकीय अधिकारी कर्मचारी तसेच शिक्षक कोरोना होत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच त्यावर मात करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबातील कोणाला सर्दी ताप खोकला आहे का याची चौकशी करत आहेत.तसेच तपमान मशीन ने घरातील प्रत्येक व्यक्तीचे तपमान चेक करत आहेत.चार वर्षाची मुलगी भक्ती हिला घरी ठेवून पूनम यांनी देशकार्यासाठी व आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी पुणे येथे सर्वेक्षण करण्यासाठी सध्या मी पुणे महानगरपालिका अंतर्गत ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय येथे कार्यरत असून पुण्यातील कोरेगाव पार्कमधील संत गाडगे महाराज वसाहत येथे सर्वेक्षणाचे काम पार पाडत आहे.
तर दुसरीकडे भक्तीचे वडील सुनील म्हेत्रे हे आष्टी तालुक्यातील खडकत येथे चेक पोस्टवर ऊसतोड मजुरांचे बीड जिल्ह्यातील आगमनाची नोंदणी करण्यासाठी 19 एप्रिल पासून कोरोना या संक्रमण रोगाचा प्रादुर्भावा च्या पार्श्वभूमीवर आपले कर्तव्य बजावत आहे. सुनील मेहत्रे हे सध्या अंशतः अनुदान तत्त्वावर अल्प वेतनावर काम करीत आहेत. चार वर्षाची चिमुरडी भक्ती मात्र आपले आई-वडील दोघेही कोरोना रोगाच्या निर्मूलनासाठी स्वतःला झोकून दिल्यामुळे एकटीच असते तिला सहारा मात्र व्हिडिओ कॉलचाच आहे. कोरोना विषाणू निर्मूलन संपूर्ण पणे कधी संपुष्टात येईल हे मात्र सांगता येत नाही. मात्र कोरोना ने भक्तीच्या मातृत्वाला तिच्यापासून दूर केला आहे हे मात्र नक्की आहे.भक्ती आज तिच्या वडिलपाशी आहे. मात्र आईला ती सध्या व्हिडीओ कॉल वरच बघते. तिच्या दोन्ही मातापित्यांचा देशसेवेसाठी चा हा त्याग खरोखरच प्रेरणादायी आहे. एकीकडे तळीराम दारुसाठी झगडत आहेत दुसरीकडे मेहेत्रे दांपत्य सारखे अनेक दांपत्य स्वतःला कोरोना निर्मूलन सेवेत झोकून दिले आहे.
आता एकच ईच्छा देशावर आलेलं कोरोना च संकट लवकर टळो, डोळ्या समोर एकच ठेवलेल एकच ध्येय जसे भारतीय विर जवान या देशासाठी लढतात त्या प्रमाणे आम्ही दोघांनी विचार केला की कोरोना निर्मूलन हेच आपले उद्दिष्ट असून सर्व त्याग करून आम्ही लढतोय, देश सेवेसाठी यां सारखे आणखी दुसरे कोणते भाग्य असू शकते. हे आम्हाला काम मिळाले खरोखरच आम्ही भाग्यशाली आहोत - सुनील मेहेत्रे
माझे पती आष्टी तालुक्यातील खडकत येथे चेक पोस्टवर ड्युटी करत आहेत. माझी चार वर्षाची मुलगी भक्ती हिला मी घरी ठेवली आहे आणि या देशकार्यासाठी माझी जबाबदारी पार पाडण्यासाठी मी पुणे येथे सर्वेक्षण करण्यासाठी हजर राहिले आहे माझ्या हातून देश सेवा घडत आहे देश सेवा करण्याचे भाग्य मला लाभले आहे - - पूनम सुनील मेहेत्रे
Leave a comment