बीड । वार्ताहर
कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांच्या माध्यमातून मराठवाडा विभागातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधून ई-लर्निंगच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचे काम चालू आहे. सबंध मराठवाड्यातील वायरमन व्यवसायाच्या विद्यार्थ्यांना दररोज प्रशिक्षण घेण्यात येते.
सध्या संपूर्ण जगामध्ये कोरोना महामारीने थैमान घातलेले आहे. प्रशिक्षणार्थ्यांनी आपली काळजी, इतरांची काळजी कशी घ्यावी व इतरांशी कशापद्धतीने वागावे या अनुषंगाने ई लर्निंगद्वारे या विषयावर व्याख्यानाचे आयोजन वायरमन ग्रुपतर्फे दि.5 मे रोजी करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संपर्क अधिकारी डॉ.अतुल साळुंके यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. समाजसेवा हीच ईश्वर सेवा आहे. आपण या समाजाचे देणेकरी आहोत, म्हणून सढळ हाताने गरजूंची सेवा केली पाहिजे, स्वतःला सुरक्षित ठेवून इतरांची सेवा करावी असे आवाहन केले.डॉ.सुदाम मोगले यांनी कोरोना विषयावर सविस्तर मार्गदर्शन करताना दररोजचा आहार, नियमित व्यायाम, सोशल डिस्टन्स, हात व चेहरा स्वच्छतेबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी मराठवाड्यातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व मराठवाड्यातील कर्मचारी, विद्यार्थी यांची व्हर्चुअल क्लासला उपस्थिती होती.सूत्रसंचालन टी.बी. मगर व आभार एन.एन. शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य पेंडकुरवार साहेब, पवन नाईकवाडे, सचिन डोंगरे, गणेश येमेवार, जाधव बी.बी. येरकर सर, अमित पुजारी सर, सांगळे सर,माने सर इत्यादींनी परिश्रम घेतले.
----
Leave a comment