धारुर । वार्ताहर
कोरोनामुळे राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे, सरकार शेतकर्यांना मदत करायला तयार नाही . संकटामुळे शेतकर्यांच्या फळबागासंह फळभाज्यांचे प्रचंड नुकसान झाले.आता खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे. शेतकर्यांजवळ मशागत करायला पैसा नाही ना खरिपाचा बि- बियाणे आणायला पैसे नाही.अशावेळी मायबाप सरकारने शेतकर्यांना मोफत बी-बियाणे आणि अवजारे वाटप करावं, अशा प्रकारची मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, गेल्या दोन महिन्यापासून कोरोना संकटामुळे राज्यातील शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले. द्राक्ष ,केळी, मोसंबी, डाळिंब ,यासारख्या फळबागा मोठ्या प्रमाणात आल्या होत्या. मात्र देशात लोक डॉकून असल्याने शेतकर्यांना आपला माल बाजारात विक्री करता आला नाही. परिणामी कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं, दुसरीकडे शेतकर्यांना या संकटामुळे हरभरा,गहू, ज्वारी हे पीक चांगले येऊन सुद्धा केवळ लोक डाऊन मुळे पदरात पाडता आले नाही.आता खरीप हंगामात पंधरा दिवसांवर आला आहे, यंदा शंभर टक्के पाऊस असल्याचा हवामान खात्याने अंदाज सांगीतला आहे. मात्र आज शेतकर्या जवळ खरिपाची मशागत करण्यासाठी कवडी दमडी नाही, शेत नांगरणीचे भाव,रुटर करण्याचे भाव दुप्पट, झालेले आहेत, त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक तणावाखाली असून जर सरकारने काही मदत केली तरच आता शेतकरी टिकेल. वास्तविक पाहता देशातील इतर राज्यात कोरोना या संकटात शेतकर्यांना सरकारने मदत केली, मात्र महाराष्ट्र सरकारन शेतकर्यांना अद्याप कुठल्याही प्रकारची मदत केलेली नाही, येणार्या खरीप हंगामासाठी शेतकर्यांना मोफत बी-बीयाणे द्यावे आणि शेतीची अवजारे मोफत देण्याची मागणी राम कुलकर्णी यांनी केली आहे.या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की , एक तर शेतकर्यांना हेक्टरी आर्थिक मदत करा, नाहीतर कृषी दुकानातून बी बियाणे सातबारावर मोफत वाटप करा, अशी मागणी करून त्यांनी म्हटले की ,इकडे संकटामुळे अर्थव्यवस्था संपूर्ण ढासळली आहे, मात्र देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असताना शेतकर्यांना आता मदत केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सरकारने या संकटात दारूचे दुकान चालू ठेवण्यापेक्षा, शेतकर्यांना मदत करण्याच बघावं अशा असाही टोला त्यांनी मारला आहे.
Leave a comment