एक लाखांहून अधिकच्या दारुसह साहित्य नष्ट
केज । वार्ताहर
केज पोलिसांनी आज गुरुवारी (दि.7) केज आणि नांदूरघाट येथे हातभट्टी विरोधात मोठी कारवाई केल. तयार गावठी दारू, हजारो लिटर दारू तयार करण्याचे रसायन आणि साहित्य असे मिळून एक लाखांहून अधिकचा मुद्देमाल नष्ट केला.
केज ठाण्याचे निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, सहाय्यक निरीक्षक संतोष मिसळे यांनी फुलेनगर, क्रांतीनगर, फलोत्पादन खात्याची रिकामी जागा, बीड केज रोड लगतच्या वडार वस्तीजवळील कचरा डेपोच्या मागे आणि नांदूरघाट अशा पाच ठिकाणी छापा मारला. यात एकूण 120 लिटर तयार गावठी दारू, 2900 लिटर दारू तयार करण्याचे रसायन, दारू काढण्यासाठी व रसायन आंबविण्यासाठी प्लस्टिकच्या टाक्या, बॅरल व कॅन असे एकूण एक लाख तेरा हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल आणि साहित्य नष्ट केले. या धाडसी कारवाईत उपनिरीक्षक महादेव गुजर, चालक सहाय्यक उपनिरीक्षक कादरी, पोहेकॉ. मंगेश भोले, मुकुंद ढाकणे, अशोक नामदास, हनुमंत गायकवाड आदी सहभागी झाले होते. केज पोलिसाच्या या कारवाईमुळे अवैध अवैद्य धंदे करणार्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून नागरिकातून या कारवाईचे स्वागत केले जात आहे.
Leave a comment