बीड । वार्ताहर
सध्या मुस्लीम धर्मीयांच्या दृष्टीने पवित्र असा रमजान महिना चालू आहे.या महिन्यात रोजदारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.मुस्लिम बांधवांना फळे खरेदी करण्यासाठी संचारबंदीतून रोज दोन तासाची सूट द्यावी अशी मागणी नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे.
सध्या बीड शहरामध्ये नागरिकांकडून संचारबंदीचे कडेकोट पालन करण्यात येत आहे. यात मुस्लिम समाज देखील जबाबदारी घेऊन सहभागी आहे.दिवसभराच्या उपवासानंतर मुस्लिम बांधव फळे व ड्रायफूड खाऊन उपवास सोडण्याची पद्धत आहे. सध्या बीड शहरात विषम तारखेला सात ते साडे नऊ या कालावधीत संचारबंदी शिथिल होते, जी वेळ पुरेशी नाही. आज संचारबंदीच्या काळात काही पत्रकार बांधवांनी मोमिनपुरा, बालेपीर आदी भागात फेरफटका मारला असता मुस्लिम बांधवांच्या वतीने संचारबंदीचे काटेकोर पालन केल्याचे दिसून आले.त्यामुळे मुस्लिम बांधवांना इफ्तारसाठी फळे, पेंड खजूर व उपवासाचे साहित्य खरेदी करण्यासाठी रोज दुपारी चार ते सहा या दोन तासांच्या कालावधीत संचारबंदी शिथिल करण्यात यावी मागणी नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी जिल्हाधिकारी, बीड यांना पत्रकाद्वारे केली आहे.
Leave a comment