बीड । वार्ताहर
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या पुढाकारातून बुधवारी (दि.6) पालवण चौक परिसरात भाजप टीमच्या माध्यमातून आरोग्य तपासणी मोहिमेचे आयोजन केले. या तपासणी मोहिमेला पालवन चौक,संत नामदेवनगर, पंचशील नगर, कृषी कॉलनी आदी परिसरातील सुमारे 800नागरिकांनी उपस्थित राहून आरोग्य तपासणी मोहिमेचा लाभ घेतला.
दीड महिन्यापासून देशभरात कोरोना लॉकडाऊन चालू आहे. सर्व व्यवहार ठप्प आहेत शासकीय रुग्णालयात शिवाय इतर सर्व खाजगी दवाखाने अक्षरशः बंद आहेत. लहान मुलं ,वयोवृद्ध नागरिक, मधुमेह रुग्ण यांना कोरोना रोगाचा संसर्ग लवकर होऊ शकतो. यामुळे ज्येष्ठ नागरिक,आजारी माणसं यांना आरोग्याच्या दृष्टीने आधार देण्याची नितांत गरज होती. भाजप नेत्या पंकजाताई मुंडे, खा. डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्या आदेशावरून व भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणीचे काम सुरू केले आहे. गेल्या 26 दिवसांपासून सातत्याने बीड शहरातील विविध भागातील नागरिकांची थर्मल स्कॅनिंग सह रक्तातील ऑक्सिजन, साखरेचे प्रमाण रक्तदाब,हृदयाचे ठोके यासारखी प्राथमिकआरोग्य तपासणी करून नागरिकांना योग्य तो सल्ला देण्याचे काम भाजपची टीम करत आहे. भगीरथ बियाणी, डॉ लक्ष्मण जाधव,विक्रांत हजारी, विलास बामणे,दत्ता पळकर,अमोल वडतीले,राजेश चरखा आदी कार्यकर्ते रोज सोशल डिस्टन्सिंग सर्व नियमांचे पालन करून आरोग्यसेवेचे कार्य करत आहेत. आज पर्यंत 76 हजार पेक्षा जा नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे काम या टीमने केले आहे. लॉकडाऊन कालावधी संपेपर्यंत ही आरोग्य मोहीम राबवण्याचा संकल्प राजेंद्र मस्के व भाजपच्या टीमने केला आहे.ही आरोग्य मोहीम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संभाजी सुर्वे राकेश बिराजदार, जालिंदर धांडे,शरद बडगे, संतोष पाबळे, महेश सावंत,विकास गव्हाणे,पंकज धांडे,स्वप्निल शिंदे,शंकर तुपे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहेत.
Leave a comment