आ.प्रकाश सोळंकेच्या प्रयत्नाला यश
वडवणी । वार्ताहर
यंदा कुंडलिका नदी कोरडी पडल्याने नदी शेजारील विहिरी,इधंनविहिरीही कोरड्या पडल्या. पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा पाणी प्रश्न निर्माण झाल्याने नदी काठच्या शेतकर्यांनी आ.प्रकाश सोळंके यांच्याकडे धाव घेतली. त्यांना पाणी टंचाइची स्थिती अवगत करून दिली. त्यानंतर आ.सोळंकेंनी याप्रश्नी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. या प्रयत्नास यश आले असून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अप्पर कुंडलिका प्रकल्पातून कुंडलिका नदी पात्रात पाणी सोडण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दरम्यान नदीकाठच्या शेतकर्यांनी समाधान व्यक्त करत आ. सोळंकेंचे आभार मानले.
सद्यस्थितीत अप्पर कुंडलिकामधून 7.0234 दलघमी इतका पाणी साठा शिल्लक असुन सदरिल प्रकल्पातून पिण्याचे पाणी आरक्षण,उन्हाळी हंगामातील बाष्पीभवन,तसेच उन्हाळी हंगामातील सिचंनासाठी आवश्यक असलेले पाणी व पाणी पुरवठा योजना इत्यादी वगळून 30 जूनपर्यंत 1.39 दलघमी पाणी शिल्लक राहत असल्याची माहिती घेउन आ. प्रकाश सोळंके यांनी शिल्लक पाणी कुंडलिका नदी पात्रात सोडण्याची मागणी केली. नदी पात्र कोरडे पडल्याने नदी काठच्या विहिरी, इंधनविहिरी कोरड्या पडल्या आहेत. नदीकाठच्या ग्रामस्थांना पिण्याचे पाणी व जनावरांकरिता पाणी नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. मात्र आता आ.साळकेंच्या प्रयत्नाला यश आले. त्यांच्या मागणीला जिल्हाधिकारी कार्यालयातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून लवकरच अप्पर कुंडलिका प्रकल्पातुन नदीपात्रात 0.2748 दलघमी इतके पाणी सुटणार आहे.
Leave a comment