अंबाजोगाई । वार्ताहर
शेतकर्यांकडे शिल्लक असलेला कापूस शासकीय हमीभावाने खरेदी व्हावा यासाठी जिल्ह्यातील सर्व कापूस खरेदी केंद्रे सुरू करावीत तसेच तुर व हरभरा खरेदी केंद्रही सुरू करावेत अशी मागणी भाजप नेते रमेशराव आडसकर यांनी जिल्हाधिकारी,बीड यांचेकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
तसेच कुंडलिका धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणीही त्यांनी केली. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना बुधवार,दि.6 मे रोजी निवेदन दिले.कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनमुळे मधल्या काळात कापूस खरेंदी बंद झाली.एकट्या माजलगावात चार हजारांवर शेतकरर्यांच्या नोंदी आहेत.आता रोज एका केंद्रावर केवळ 50 शेतक-यांच्या कापसाचे माप होत आहे.अशाने पुढील सहा महिने ही कापूस खरेदी उरकणार नाही असे निवेदनात म्हटले आहे.त्यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतक-यांचे नुकसान टाळण्यासाठी सर्वच हमीभाव खरेदी केंद्र सुरु करुन सरसकट कापूस खरेदी करावा अशी मागणीही त्यांनी केली.तसेच शेतक-यांकडे सध्या मोठ्या प्रमाणावर तुर व हरभरा पिकांचे उत्पादन झाले आहे.मात्र,खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकरी हवालदिल आहेत. यासाठी तुर व हरभरा हमीभाव खरेदी केंद्रही सुरू करण्याची मागणी रमेशराव आडसकर यांनी केली.तसेच सोन्नाखोटा, पिंपळटक्का,चिंचवण,पहाडी दहिफळ या भागातील शेतक-यांच्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे.त्यामुळे कुंडलिका धरणातील पाणी नदीपात्रात सोडावे अशी मागणीही रमेशराव आडसकर यांनी केली आहे.
Leave a comment