अंबाजोगाई । वार्ताहर
जुन्या भांडण्याच्या कारणावरून तालुक्यातील चतुरवाडी येथे मंगळवारी (दि.5) दोन गटात हाणामारी झाली. शिवीगाळ करत एकमेकांना दगड आणि लोखंडी पाईपने मारहाण करण्यात आली. या प्रकरणात परस्परविरोधी तक्रारीवरून सहा जणांवर ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
निशीकांत कांबळे (18, रा. चतुरवाडी) याच्या तक्रारीवरून,आरोपींनी जुन्या भांडण्याच्या कारणावरून शिवीगाळ करत लोखंडी पाईपने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. यावरून अरूण कांबळे, सचिन कांबळे, प्रतिक जोगदंड व अन्य एक (सर्व रा. चतुरवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तर अरूण कांबळे (35) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,आरोपींनी शिवीगाळ करत दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. यावरून निशीकांत कांबळे व नागनाथ कांबळे या दोघांवर गुन्हा दाखल झाला. पो.ह. नागरगोजे या दोन्ही प्रकरणाचा तपास करत आहेत.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment