आष्टी । वार्ताहर
तालुक्यातील दादेगाव येथे एका व्यापार्याच्या घरात शिरलेल्या चोरट्यांनी सोन्याचे दागिणे व 5 हजारांची रक्कम असा 72 हजार 500 रूपयांचा ऐवज लंपास केला. मंगळवारी (दि.5) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.
दादेगाव येथील नितीन नेहरू विधाते यांचे गावात किराणा दुकान आहे. सोमवारी रात्री त्यांच्या घरात शिरलेल्या चोरट्यांनी कपाटातील लॉकरमधील सोन्याचे 67 हजार 500 रूपये किमतीचे 27 ग्रॅम वजनाचे गंठण व 5 हजारांची रक्कम असा 72 हजार 500 रूपयांचा ऐवज चोरून नेला.चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर मंगळवारी दुपारी नितीन विधाते यांनी अंभोरा ठाण्यात तक्रार नोंदवली. उपनिरिक्षक दाभाडे अधिक तपास करीत आहेत.
Leave a comment