डॉ.अशोक थोरात यांनी सांगितली प्रेरणादायी गोष्ट

बीड । सुशील देशमुख 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरु असलेला लॉकडाऊन आणि जनतेकडून प्रशासनाला केले जात असलेले सहकार्य याबाबत सर्व जनतेचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी आभार मानले आहेत. याबाबत त्यांनी आज बुधवारी (दि.6) सकाळी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ते म्हणतात...

 

‘मला एक लहानपणीची गोष्ट आठवते...आपण लहानपणी पोहायला शिकत असताना  सर्वप्रथम कुठल्यातरी वस्तूचा आधार...मग भोपळा अथवा ट्यूब असेल ...याच्या माध्यमातून आपण पोहायला शिकत असतो...त्यानंतर आपले वडिलधारी मंडळी आपल्या पोटाखाली हात ठेवून पोहायला शिकवत असतात...हे करत असताना ते आपल्या कळत-नकळत आपल्या पोटाखालचा हात काढतात...नंतर त्यावेळेला आपल्या स्वत:ला हात-पाय हलवून पोहायचं असतं...अन् अशा पध्दतीनेच आपण पोहायला शिकत असतो...’

 

लॉकडाऊनच्या अनुषंगाने कदाचित अशा प्रकारची परिस्थिती आपल्यासमोर असणार आहे.आत्तापर्यंतच्या काळापेक्षा अत्यंत कठीण काळ पुढचा असणार आहे. लॉकडाऊनमधील जी काही आपल्याला सुट मिळत आहे व भविष्यकाळात मिळणार आहे. त्याचा चांगल्या कामासाठी उपयोग केला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये लॉकडाऊन उठल्यानंतर आपल्याला या आजाराचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी आपल्या प्रत्येकाला काळजी घ्यावयाची आहे.

 

‘जिल्हा प्रशासन या लढ्यामध्ये शेवटपर्यंत तुमच्या पोटाखालचा हात काढणार नाही,परंतु आपण हातांची स्वच्छता असेल, तोंडाला मास्क लावणे असेल, सॅनिटायझरचा वापर असेल सोशल डिस्टटिंग असेल किंवा अनावश्यक गर्दी टाळणे असेल.या सर्व गोष्टी लॉकडाउनच्या काळात तुम्ही सर्वांनी पाळल्या त्याच पध्दतीने भविष्यकाळामध्ये पण या गोष्टी अंगिकारल्या पाहिजेत. तरच आपण या कोरोनाच्या विरोधातील लढाईमध्ये यशस्वी होवू आणि तस आपण सर्वजण करुया...असे आवाहनही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी केले आहे. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.