जामखेडमध्ये रुग्ण आढळल्यानंतर
आरोग्य यंत्रणेने केले घरोघर सर्व्हेक्षण
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यालगतच्या जामखेडमध्ये कोरोनो पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्यानंतर आष्टी तालुक्यातील जामखेडपासून जवळ असलेल्या सहा गावांमध्ये प्रतिबंधात्मक व्यवस्था तसेच संचारबंदीची कडेकोट अंमलबजावणी करत ही सर्व गावे अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी 23 एप्रिल रोजी घेतला होता. दरम्यान त्यानंतर या सहा गावांतील 1 हजार 954 घरांमधील 10 हजार 30 नागरिकांची जिल्हा आरोग्य विभागाच्या माध्यमातून आरोग्य तपासणी व सर्वेक्षण करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी ही माहिती दिली.
हरिनारायण आष्टा, चिंचपूर, भातोडी,कर्हेवडगाव, गांधनवाडी मातकुळी या सहा गावांमध्ये आरोग्य सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.आष्टी तालुका आरोग्य अधिकार्यांसह आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवकांच्या टिमने 24 एप्रिलपासून दररोज या बफर झोनमधील गावांमधील घरांतील नागरिकांची आरोग्य तपासणी केली आहे. यात सर्दी, ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होतो का याची तपासणी केली गेली. मात्र या ठिकाणी कोणालाही अशी लक्षणे आढळून आली नाहीत.
जामखेड (ता.अहमदनगर) येथे कोरोनाचा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दि.23) आष्टी तालुक्यातील सहा गावे अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. जामखेडपासून ही सर्व गावे चार कि.मी.अंतरावर असल्यामुळे हा परिसर बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला होता.
Leave a comment