शिरुरकासार । वार्ताहर
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने तालुक्यातील पोलीस आणि पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली.शहरातील जि.प. शाळेत आयोजित करण्यात आलेल्या या तपासणी शिबिरासाठी पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपला जीव धोक्यात घालून तळागाळापर्यंतच्या लोकांना समाजातील सर्व घटनांची माहिती पोहचविण्याचे काम करणार्या आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणार्या तालुक्यातील पत्रकारांची आरोग्य तपासणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिरात वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर खाडे,डॉ.सचिन पिसे,राजश्री डमाळे,व्ही.आर.लातूरकर,मीरा तांबे,बिजु ढाकणे,नितीन तिजोरे यांनी तपासणी केली.सदरील कर्मचार्यांनी पोलीस स्टेशनच्या कर्मचार्यांची देखील तपासणी केली.या वेळी पत्रकार विजयकुमार गाडेकर,बबन देशमुख,अशोक भांडेकर,नवनाथ येवले,युवराज सोनवणे,रामनाथ कांबळे,समीर पठाण,सुनिल जेधे,राज कातखडे,मनोज परदेशी,बाळकृष्ण मंगरूळकर,सतिश मुरकुटे, गोकुळ पवार,अशोक जायभाये,साहित्यिक अनंत कराड,विठ्ठल जाधव,अतिष गाडेकर,बाळासाहेब बोराडे यांची उपस्थिती होती.
Leave a comment