आणखी एक जण शिरूर तालुक्यात
शिरूरकासार । वार्ताहर
पाथर्डी तालुक्यातील मोहज देवडे गावात दोन दिवसापूर्वी शिरूर तालुक्यातील फुलसांगवी जवळील मारकडवाडी येथील एक 25 वर्षीय युवक जाऊन आल्याने खळबळ उडाली आहे. देशासह जिल्ह्यात कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना जिल्हा प्रशासनाने गेली दीड महिन्याच्या अथक प्रयत्नांतून शून्याचा आकडा अबाधित ठेवला आहे परंतु शेजारील जिल्ह्यातून छुप्या मार्गाने काहीजण येत असल्याने जनतेचा जीव टांगणीला लागला आहे.
गेली दोन दिवसापूर्वी तालुक्यातील आर्वी या ठिकाणी येणार्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर शिरूर तालुक्यातील फुलसांगवीजवळ असलेल्या मारकडवाडी येथील एका 25 वर्षीय युवकाने आपल्या भोवरवाडी येथील आईच्या आत्याची तबेत बिघडल्याने खरवंडी येथील दवाखान्यात दाखल केले त्यानंतर त्याठिकाणी कोरोनाग्रस्त आढळलेल्या मोहज देवडे गावातील नातेवाईक भेटण्यास आले त्यानंतर सर्वजण मोहजदेवडे या गावात गेले त्यानंतर मारकडवाडी येथील युवक गावी परतला. ही माहिती ग्रामस्थांनी फुलसांगवी चे सरपंच रमेश तळेकर यांना दिली त्यानंतर त्यांनी या युवकास व त्याच्या कुटुंबीयांना समजावून क्वॉरंटाईन होण्यास भाग पाडून शेतामध्ये सर्व कुटुंब क्वॉरंटाईन करण्यात आले आर्वी नंतर मारकडवाडी (फुलसांगवी) येथे कोरणा ग्रस्त आढळलेल्या गावातून युवक आल्याने खळबळ उडाली आहे.
Leave a comment