गेवराई / मधुकर तौर
तालुक्याातील गोळेगाव येथे गोसावी समाज राहात असुन तेथील लोक उपाशी दिवस काढत आहेत.त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही .आसा मोबाईल नायब तहसिलदार प्रशांत जाधवर यांनाआला. त्यांनी तात्काळ माहिती घेऊन तेथील २४ गरजु कुटुंबाला अन्न धान्य किराणा किट चे वाटप केल्याने त्यांचा १५दिवसाचा रोजी रोटीचा प्रश्न मिटला आहे.त्यांनी केलेल्या या सामजिक दायित्वामुळे त्यांचे सर्वञ कौतुक होत आहे.
सध्या सरकार कोरोना विषाणु मुळे संपूर्ण देश लॉक डाऊन आहे.अनेक हातावर पोट असणाऱ्यांची उपासमारीची होत आहे.गेवराई तालुक्यातील गोळेगाव येथील गोसावी समाज व इतर गोरगरिब कुटुंबांना राशन कार्ड नसल्याने अन्नधान्य मिळाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली ही बाब काही सामाजिक कार्यकर्त्यांनी गेवराईचे नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांना संगितली. त्यांनी तात्काळ प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत स्वखर्चातून गोळेगाव येथे जाऊन गोसावी समाजासह इतर काही गोरगरिब 24 कुटुंबियांना तात्काळ अन्नधान्य व किराणा साहित्याचे वाटप केले.त्यांनी वाटप केलेल्या किट मुळे त्यांचा १५दिवसाचा रोजी रोटीचा प्रश्न मिटला आहे. यावेळी त्यांच्यासमवेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय कदम,जतेगाव रुग्णालयाचे डॉ.फड,डॉ.जीवनकुमार राठोड,सरपंच काळे,पत्रकार दत्ता वाघमारे यंच्यासह आदींची उपस्थिती होती. दरम्यान यापूर्वी वाहेगाव, मान्यरवाडी यासह अनेक ठिकाणी या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गरजू कुटुंबियांना मदत केली आहे.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की जगात कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारत देशात ही दिवसेंदिवस कोरोना संक्रमणच्या संख्येत वाढ होत आहे. लॉकडाऊनमुळे बाराबलुतेदार, मध्यम वर्गीय व हातावरचे पोट असणाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गेवराई तालुक्यासह बीड जिल्ह्यातील नागरिकांचे हातावरचे पोट असणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तालुक्यात असे अनेक कुटुंब आहेत की ज्यांना दररोज काम केल्याशिवाय त्यांच्या घरी चूल पेटत नाही. सर्व कामधंदे बंद असल्यामुळे या गोरगरीब कुटुंबातील लोकांना दोन वेळचे जेवण मिळणे दुरापास्त झाले आहे. परीणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या भागातील दानसूर व्यक्तिंनी गोरगरीब जनतेच्या मदतीसाठी पुढे येणे गरजेचे आहे. तसेच तालाठ्यांमार्फत प्रशासनालाही याची माहिती द्यावी जेणेकरून कोणावरही उपासमारीची वेळ येणार नाही असे अवाहन गोळेगाव येथे धान्य वाटप प्रसंगी बोलताना ना. तहसीलदार जाधवर यांनी केले.
Leave a comment