जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश, अनेक प्रश्न मार्गी

बीड/प्रतिनिधी
कोरोनाच्या लढाईत मुख्यमंत्री सहायत्ता निधी साठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी 10 लाख 500 रु चा धनादेश आज बीड चे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे सुपूर्द केला , त्यानंतर दीड तासाच्या बैठकीत जनतेचे अनेक प्रश्न समोर ठेऊन प्रश्नांची सोडवणूक करत, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले,

कोरोना संकटात राज्यसरकारला मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते,  या आवाहनानंतर  राज्यसरकार च्या मुख्यमंत्री सहायत्ता निधी साठी ओघ सुरू झाला, आज बीड मध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी कोरोनाच्या कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी  मुख्यमंत्री सहायत्ता निधी साठी  माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या ताब्यात असलेल्या गजानन सह सूत गिरणी, गजानन  नागरी  सह बँक , बीड नगर परिषद , कृषी उत्पन्न बाजार समिती, तालुका सहकारी दूध संघ बीड , सौ के एस के महाविद्यालय कर्मचारी पत संस्था,नवगण विनायक कर्मचारी व पत संस्था, आदर्श शिक्षण संस्था कर्मचारी पत पेढी,यांच्या वतीने 10 लाख 500 रु चा धनादेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी  अनेक प्रश्नां संदर्भात जिल्हाधिकारी यांना निर्देश देण्यात आले यात, बुडीत क्षेत्रातील विहीरी ची कामे तातडीनं चालु करावी जे ने करून हाताला काम मिळेल आणी पाणी टंचाई मार्गी लागेल, बीड शहरातील अंडर ग्राउंड ड्रेनेज व पाईपलाईन चे काम जलद गतीने पावसाळा पूर्वी सुरू करावीत, ही कामे सम आणि विषम या दोन्ही दिवसात पूर्ण झाली तर गतीने कामे होतील, कापुस खरेदीच्या संदभात रोज पन्नास ट्रक माप होणे आवश्यक आहे पण तसे होत नाही, हरभरा, तूर खरेदी केंद्र तातडीने सुरू करा, शहरी आणि ग्रामीण भागात नागरिकांना बँक व्यवहार करण्यासाठी जास्तीचा वेळ देण्यात यावा, शहरात अन ग्रामीण भागात जीवणावयशयक वस्तूच्या खरेदी साठी संचारबंदी काही प्रमाणात शिथिल करावीत, खरीप हंगाम डोळ्यासमोर ठेऊन बी बियाणे अन खते उपलब्ध करावीत, यासाठी शेतकरी अन व्यापारी याना पुरेसा वेळ उपलब्ध करून दयावा, जुने रेशन कार्ड आहे मात्र ऑनलाईन नोंदणी झाली नाही अशां नागरिकांना दोन महिन्याचे धान्य उपलब्ध करून घ्यावे, बीड तालुक्यात, 80 हजार लिटर दुध उत्पादन क्षमता असताना शासनाने 40 हजार लिटर दुधाचा कोठा कमी केला आहे तो वाढवून मिळावा, ज्वेलरी दुकानासाठी ठराविक वेळ देऊन या दुकान उघडकीस परवानगी मिळाली तर सोयीचे होईल, आधी निर्देश दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी सगळे प्रश्न मार्गी लावले ज्यात विहिरींची कामे बीड शहरातील अंडर ग्राउंड ची कामे हरभरा तूर खरेदी साठी ग्रेडर ची नियुक्ती, अन ऑनलाईन नसलेल्याना रेशन मिळवून देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले लॉक डाऊन मध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी घेतलेली जिल्हाधिकारी यांची भेट जनतेसाठी फायद्याची ठरली आहे, मदतीची ही सुरुवात आहे या काळात रोगाशी लढायचे आहे, रोग्याशी नाही, असे सांगून त्यांनी आगामी काळात जनतेच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याचे आश्वासन दिले, यावेळी  बीड चे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती दिनकर कदम, दूध संघाचे चेअरमन विलासराव बडगे, अरुण डाके, गणपत डोईफोडे, अरुण बोगाणे नाना मस्के , सखाराम मस्के आदी उपस्थित होते ,

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.