चकवा देत इरफान व असेफ हे बीड मध्ये असणार्या एका नातेवाईकाच्या घरी आले ....
सिरसाळा । वार्ताहर
सिरसाळा येथील मारहाण प्रकरणात आरोपी असलेल्या दोन आरोपींना कारागृह अधिक्षकांच्या आदेशावरून जिल्हा रूग्णालयात कोरोना चाचणी करण्यासाठी आणले असता स्वॅब घेण्यापूर्वीच या दोन्हीही आरोपींनी रूग्णालयातून धुम ठोकली आणि ते फरार झाले. दरम्यान पोलीसांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ते कोठेही सापडले नाहीत. सिरसाळा येथील शेख इरफान शेख बिबन आणी असेफ गफार बागवान अशी पलायन केलेल्या दोन आरोपींची नावं आहेत.
सिरसाळा येथील नवाज खा आयुबखा पठाण या युवकास बाहेर गावी जाण्यासाठी दुचाकी का दिली नाही असे म्हणत रस्त्यावर अडवून बेल्ट, दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना शनिवारी घडली होती.त्याच वेळी नवाज खा याने दिलेल्या फिर्यादीवरून त्या दोघांवर सिरसाळा पोलीस ठाण्यात कलम 307, 323, 504, 507,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
परळी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दोन्ही आरोपींना शासकीय वाहनाने बीड येथे घेऊन जाण्याची जवाबदारी येथील पोलीस ठाण्याचे पो ना बाळू जाधव, पो कॉ शिवाजी मुंडे यांच्यावर देण्यात आली होती.ते आरोपींना घेऊन दुपारी चार वाजता कारागृहात दाखल झाले असता त्या ठिकाणी त्यांना आरोपींची कोरोना तपासणी करून या असे सांगितल्याने पुन्हा त्याच वाहनातून जिल्हा रुग्णालयात कोरोना तपासणी साठी दाखल केले. जवळ कोणी नसल्याचा फायदा घेत स्वॉब घेण्या आधीच आरोपी इरफान व असेफ याने पलायन केले या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात पो कॉ शिवाजी मुंडे यांच्या फिर्यादीवरून पलायन केले म्हणून दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला.
कोरोना वार्डातुन पोलिसांना चकवा देत इरफान व असेफ हे बीड मध्ये असणार्या एका नातेवाईकाच्या घरी आले परंतु पोलीस आले असल्याची चुणूक लागताच घरावरून उड्या मारून तेथून ही पळ काढला.
सूत्रांच्या माहिती नुसार गुन्हेगारी प्रवृत्तीच्या असलेल्या यातील एका आरोपीने या आधीही असेच पलायन केले होते.त्यावेळी त्यास पोलिसांनी अवघ्या काही तासात जेरबंद ही केले होते. पलायन केलेले दोघे ही येथील नवाज पठाण मारहाण प्रकरणातील आरोपी आहेत त्याचा तपास पो उ नी जगन्नाथ पुरी हे करत असल्याने प्राथमीक माहिती घेण्यासाठी त्यांची भेट घेतली असता काहीच माहिती नाही असे म्हणत त्यांनी व पो.कॉ. संतोष जेटेवाड यांनी बीड येथून माहिती घेण्याचा अजब सल्ला सर्व माध्यम प्रतिनिधीना दिला. तर सपोनि श्रीकांत डोंगरे यांनी आरोपींणी पलायन केले यास दुजोरा देत तपास सुरू असल्याचे ही ते म्हणाले.
Leave a comment