आज लोडशेडिंगमुळे राज्यात शेतकरी ञस्त ; 24 तास विद्युत पुरवठा करा

-भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी यांची मागणी

 

अंबाजोगाई । वार्ताहर

मानवी जिवाच्या मुळावर आलेल्या कोरोना संकटामुळे महाराष्ट्रातील शेतकरी नेस्तनाबूत होत असताना राज्यातील आघाडी सरकारने भर उन्हाळ्यात लोडशेडिंग सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांची पिके जळून भस्मसात होत आहेत.देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात लोडशेडिंग हा शब्दच गायब झाला होता. ? आता पुन्हा लोडशेडिंगने डोकेवर काढत शेतकऱ्यांना आडचणीत आणले. या संकटात 24 तास विद्युत पुरवठा शेतकऱ्यांना केला पाहिजे अशी मागणी भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे. 

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी म्हटले आहे की,15 मार्च पासून राज्यात कोरोना संकटाने धुमाकूळ घातला आहे.देशात लॉकडाऊन असल्यामुळे या संकटात शेतकरी सापडला असून उत्पादित केलेला  माल, धान्य आणि फळभाज्या विक्री करण्यासाठी बाजारपेठा बंद आहेत. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाची नासाडी झाली असून कोट्यावधी रूपयांच्या फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. केळी,द्राक्षे,उत्पादक अडचणीत आले.हे संकट अस्मानी असून मानवी जीवावर येऊन बसला आहे, दुसरीकडे राज्यातील आघाडी सरकारने भर उन्हाळ्यात लोडशेडिंग लागू केलेला आहे.सध्या शेतकऱ्यांना चोवीस तासांपैकी की केवळ आठ तास विद्युत पुरवठा केला जातो.खरं म्हणजे सरलेल्या पावसाळ्यात शेवटच्या टप्प्यात पाऊस ब-यापैकी पडला म्हणून काही प्रमाणात धरणे भरली.मात्र आज परिस्थिती उलटी आहे.पाण्याने धरणे भरलेली असताना विजेचा पुरवठा सुरळीत नाही.आठ तास पुरवठा केला जातो आणि त्यातही सतत तांत्रिक बिघाड होत असल्याने वीज कधी येते आणि कधी जाते हेच कळत नाही. परिणामी शेतकऱ्यांचे ऊस,भुईमूग बागा किंवा इतर पिके असतील पाण्याअभावी वाळून जात आहेत.वास्तविक पाहता लोडशेडिंग आणि आणि आघाडी सरकार यांचं आगळंवेगळं नातं जुनेच असल्याची खोचक टिका त्यांनी केली.राज्यात आ.देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना लोडशेडिंग हा शब्द गायब झाला होता.? 24 तास शेतक-यांना विद्युत पुरवठा सुरळीत व्हायचा.विज प्रश्नावर पाच वर्षांत कधीच ओरड झाली नाही आणि आज पुन्हा या लोडशेडिंग या शब्दाने डोके वर काढले आहे.शेतकरी हैराण झाला असून तो परेशान आहे. अगोदरच कोरोना या संकटाने शेती पिकांवर नांगर फिरवला आणि आता कशी बशी सिंचनाची वेळ असताना शिवाय पाण्याची मुबलक उपलब्धता असताना विद्युत पुरवठा 24 तास होत नाही.हे शेतकऱ्यांचे दुर्दैव म्हणावे लागेल.राज्यातील सत्ताधारी आघाडी सरकारकडून शेतकऱ्यावर फार मोठा अन्याय होत आहे.एकीकडे अजूनही ही धानाची खरेदी सुरू नाही.शेतक-यांच्या हरभरा आणि तूर खरेदीसाठी नोंदी घेणे सुरू आहेत.तर दुसरीकडे अशाप्रकारे लोडशेडिंगच्या प्रकाराने शेतकरी जाम वैतागला आहे.किमान या संकटात तरी सरकारच्या वीज खात्याने शेतक-यांना विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे.मुळात लोडशेडिंग हा शब्दच शेतक-यांच्या जीवनातून कायमचा काढून 24 तास विज शेतक-यांना दिली तर अशा संकटात आता शेतकरीच वाचेल अन्यथा बाकी सर्व शेतक-यांवर नेस्तनाबूत होण्याची वेळ आलेली आहे.राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या चोवीस तास वीज प्रश्नावर तात्काळ निर्णय घेऊन लोडशेडिंग थांबवावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

       

 

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.