किल्लेधारुर । वार्ताहर
किल्लेधारूर येथे हिंगोली जिल्ह्यातील ऊसतोड कामगार मजूर पश्चिम महाराष्ट्रामधून त्यांच्या गावी जात होते. परंतु प्रशासनाने खबरदारी म्हणून त्यांना धारूर याठिकाणी अडवले आणि त्यांना कस्तुरबा गांधी विद्यालय याठिकाणी थांबवण्यात आले परंतु जवळपास शंभर जण असणारे हे ऊसतोड कामगार यांना खाण्यापिण्याची सोय व्हावी यासाठी प्रशासनाने लक्ष दिले त्याच बरोबर त्यांना 14 दिवस आहे त्याच ठिकाणी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यानच्या काळात त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था व्हावी यासाठी किल्लेधारुर युथ क्लब या सामाजिक संघटनेने पुढाकार घेऊन त्यांना किराणा माल यासाठी मदत केली या कार्यासाठी किल्लेधारूर युथ क्लबच्या सदस्यांनी वर्गणी गोळा करून त्यांना किराणामाल उपलब्ध करून दिला.
किराणा मालवाटप करताना तहसीलदार श्रीमती एस.व्ही.शिडोळकर धारूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास हजारे, पो.नि.सुरेखा धस आदी उपस्थित होते.या उपक्रमासाठी सुरेश शिनगारे,अविनाश चिद्रवार,सूर्यकांत जगताप,प्रा नितीन शुक्ला,अनिल तिवारी सर, गौतम शेंडगे,दत्ता गोरे,बबलू दिख्खत,विशाल दिख्खत ,कपिल समर्थ,अशोक लोकरे, राजु गुन्नाल,शिवराज शिनगारे, सुभाष पवार उपस्थीत होते तर इंजि.संतोष दुबे,अमर रुद्रवार,विजय शिनगारे,अभयसिंह चौहान, बाबुराव शिनगारे यांनीही आर्थिक हातभार लावला.किल्ले धारूर युथ क्लब सदस्य प्रा.नितीन शुक्ला हे दरवर्षी आपल्या आईचा वाढदिवस काही ना काही सामजिक उपक्रम घेऊन साजरा करत असतात. त्यांनी या वर्षीचा वाढदिवस ऊसतोड मजूरांना गरजेचे साहित्य देवून साजरा केला. कपिल समर्थ यांनीही आपल्या वाढदिवसाला खर्च करण्याची रक्कम या समाजकार्यासाठी दिली. या कार्यकमासाठी स्थानिक पत्रकार मंडळी या वेळी उपस्थित होते त्यामध्ये महादेव देशमुख,सुनील कावळे,नाथा ढगे हे उपस्थित होते.किल्ले धारूर युथ क्लब ही सामाजिक संघटना,कोरोनाच्या विरुद्ध लढणार्या या लढयात मास्क वाटप असो किंवा किराणा माल वाटप असो नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते असे गौरवोद्गार मान्यवरांनी व्यक्त केले.
Leave a comment