राजापूर । वार्ताहर
सध्या जगभरात कोरोना महामारीचे संकट असल्याने प्रशासन सतर्कतेने आपली जबाबदारी पार पाडत आहे. परंतु बियर बार, वाईन शॉप, या पूर्णपणे बंद असल्याने गेवराई तालुक्यातील राजापूर येथील हातभट्टी व्यवसाय मोठ्या तेजीत सुरू आहे. वारंवार स्थानिक पोलीस स्टेशन ने धाडी टाकत हजारो रुपयांचे रसायन नष्ट करण्यात आलेले असतानाही या हातभट्टी व्यावसायिकांना जरब बसलेली दिसून येत नाही.
अंदाजे दहा खेड्यातील लोक हातभट्टी दारू घेऊन जाण्यासाठी राजापूर गावात प्रवेश करतांना दिसत आहेत. या हातभट्टी काढणारे लोकांना गावकर्यांनी वारंवार सांगून ही हातभट्टी दारूची विक्री थांबत नाही. याउलट ग्रामस्थांना तुमच्यावर आम्ही खोटी गुन्हे दखल करू तुमच्यावर विविध प्रकारचे आरोप करून जेल मध्ये टाकू अशा प्रकारच्या धमक्या हे लोक ग्रामस्थांना देत आहेत. यामुळे गावाला कोरोना पासून वाचवायचे तरी कसे असा प्रश्न ग्रामस्थ पुढे निर्माण झालेला आहे. या प्रकाराकडे जिल्हा पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची अत्यंत गरज निर्माण झालेली असून नाहक ग्रामस्थांना खोट्या गुन्हे मध्ये अडकवण्याचा प्रयत्न या हातभट्टी दारू विक्री करणार्या कडून होतांना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाने यांचे हातभट्टी व्यवसाय उध्वस्त करून गुन्हे दखल करावेत अशीही मागणी ग्रामस्था कडून होतांना दिसत आहे.
Leave a comment