राष्ट्रवादीचे युवा नेते गणेश सावंत यांनी उपोषण करु असा इशारा दिला
धारूर । वार्ताहर
धारूर शहरातील मठगल्ली परीसरात घाणीचे साम्राज्या मुळे गल्ली तापेने फणफणलीअसून डेंग्यु सदृश्य स्थितीमुळे नागरिकांत माञ भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी आशी मागणी होत आहे. या भागात आरोग्य विभाग घरोघर जाऊन सर्व्हे करणार आहे.
शहरातील कसबा विभागात मठ गल्लीत गेल्या चार पाच दिवसापासून घाणीचे साम्राज्यामुळे गल्लीत तापाने फणफणली असून सात जणांना डेंग्यु सदृश्य आजार दिसून येत आहेत. नगरपालिकेकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने तापीचे रुग्ण वाढले आहेत. एका मुलाला तापेने फनफनल्याने धारूर येथे उपचार करून अंबाजोगाई येथे उपचारासाठी हलवण्यात आले तर अन्य बालके तापेने फणफणले असून त्यांना खाजगी रुग्नालयात उपचार घेण्यात आले. नगरपालीका प्रशासन स्थितीवर लक्ष ठेवून असून या भागातील नाल्या व रस्ते स्वच्छता करण्यात आली आहे.या भागातील नागरीकानी स्वच्छता पाळावी असे आवाहन मुख्याधिकारी सुहास हजारे यांनी केले आहे. दरम्यान या भागात आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघर जाऊन सर्व्हे करणार असून या भागात स्वच्छते बद्दल जनजागृती केले जाणार आहे असे ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.चेतन आदमाने यांनी सांगीतले. वारंवार अर्ज करुनही नगरपरिषद स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत असल्याने राष्ट्रवादीचे युवा नेते गणेश सावंत यांनी उपोषण करु असा इशारा दिला आहे.
Leave a comment