बीड | वार्ताहर
बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जमावबंदी, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या सर्व उपाययोजनामधील अधिसूचनांचे उल्लघंन करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी ठाणेदार यांना दिले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या अधिसुचनांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आजपर्यंत बीड जिल्ह्यात विविध ठाण्यात 2 हजार 298 आरोपीविरुध्द 668 गुन्हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती सोमवारी (दि.4) पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.
दि.2 मे रोजी जिल्ह्यात 63 जणांविरुद्ध कलम 188 प्रमाणे वेगवेगळे 20 गुन्हे तर 3 मे रोजी 58 आरोपीविरूध्द वेगवेगळे 15 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर आजपर्यंत जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस टाण्यांमध्ये 2298 आरोपी विरुद्ध 668 गुन्हे दाखल झाले आहेत.
2 मे रोजी जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्रेते , हातभट्टी दारू बनविणारे यांच्यावर एकूण 5 ठिकाणी छापे टाकून 5 आरोपी विरुध्द मुंबई दारुबंदी कायद्याअन्वये गुन्हे दाखल करून 21 हजार 300 रू.किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. 3 मे रोजी जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्रेते हातभट्टी दारू बनविणारे यांच्यावर एकूण 6 ठिकाणी धाडी टाकून 7 जणांविरुद्ध मुंबई दारुबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करून 42 हजार 70 रू.किंमतीचा मुद्देमाल जप्त
केला गेला.
Leave a comment