बीड | वार्ताहर
बीड जिल्ह्यात लॉक डाऊन च्या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी नवीन आदेश जारी केले असून यामध्ये छोट्या व्यावसायिकांना काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे त्यानुसार अशा व्यापाऱ्यांनी अधिकृत परवाना मिळवण्यासाठी बीड नगरपालिकेत नियुक्त करण्यात आलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांकडून शिफारस पत्र घेऊन जावेत व नियमांचे पालन करून व्यवहार सुरू करावा असे आवाहन नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी केले आहे.
बीड जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या नवीन संचारबंदी आणि जमावबंदी आदेशानुसार शहरातील काही व्यवसायासाठी सूट देण्यात आली आहे त्या व्यापारी बांधवांनी जिल्हाधिकारी, बीड यांच्या आदेशान्वये दुकानांसाठी पास मिळवण्याकरिता मुख्याधिकारी नगर परिषद, बीड यांचे शिफारस पत्र आवश्यक आहे अशा व्यापारी बांधवांनी आज सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 या वेळेत बीड नगरपालिकेत स्वतःच्या दुकानाचे लायसन्स, स्वतःचे आधार कार्ड व स्वयंघोषणापत्र घेऊन बीड नगर परिषदेचे कर्मचारी अविनाश धांडे यांच्याशी सम्पर्क साधावा व शिफारस पत्र घेऊन जावे असे आवाहन नगराध्यक्ष डॉ भारत भूषण क्षीरसागर यांनी केले आहे.
Leave a comment