पोलीस उपनिरीक्षक अर्चना भोसले यांची कार्यवाही
केज । वार्ताहर
केज तालुक्यातील बोरगाव येथील चेक पोस्टवर चार बॅरल हे एसीई छोटा हत्ती या दुधाची वाहतूक करणाऱ्या वाहनातून बेकायदेशीर वाहतूक होत असताना संचारबंदी व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्या प्रकरणी प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक अर्चना भोसले यांनी कार्यवाही करून १३० लिटर डिझेल आणि छोटा हत्ती ताब्यात घेतला.
या बाबतची माहिती अशी की, दि. ३ मे रोजी दुपारी १:१५ वा बोरगाव चेक पोस्टवर एक एसीई छोटा हत्ती या दूध वाहतूक करणाऱ्या क्र.(एम एच.१४/ जी यु ६९३१) या वाहनात चार बॅरल मधून बेकायदेशीरपणे १३० लिटर वाहून नेले जात होते. त्या वेळी चेक पोस्टवर कर्तव्यावर असलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक अर्चना भोसले आणि त्यांचे सहकारी यांनी कार्यवाही करून ८७१० रु किमतीचे डीझेल चार बॅरल आणि छोटा हत्ती असे एकूण २लाख २४ हजार ५१० रु चा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अर्चना भोसले यांच्या फिर्यादी नुसार हयगयीने ज्वालाग्राही पदार्थ डिझेल स्वताचे ताब्यात बाळगुन व त्याची वाहतुक करताना मिळुन आला. कोरोना संसर्ग संबंधाने मा. जिल्हाधिकारी साहेब बीड यांचे संचारबंदीचे आदेशाचे व जिल्हा कार्यकारी समीतीने दिलेल्या आदेशाचे उल्लघंन केले. त्या प्रकरणी सलिम मुस्ताफा शेख वय २५ वर्षे रा. काळेगाव ता. केज गु. र. नं. १६७/२०२० भा. दं. वि. १८८, ३६९, २७० १८५ सह ५१ (ब) सह कलन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ सह कलम १७ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखी पोलीस हेडकॉन्स्टेबल जाधव हे करीत आहेत.
Leave a comment