गेवराई । अय्युब बागवान
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अचानक कोणतीही सूचना न देता केंद्र सरकारन केलेल्या लॉक डाऊन मध्ये इतर राज्यातुन आलेले हजारो कामगार इथेच अडकले! काम बंद, हताश झालेल्या कामगाराना आता त्यांना जाण्याची परवानगी दिल्याने ते जाम खुश असून अर्ज, नाव नोंदणी साठी धड़पडत असल्याचे चित्र दिसत आहे. आपल्या गावी जाता येईल बायको लेकारांची भेट होईल या आशेने कामगाराना गावी जाण्याची ओढ़ लागली आहे.
देशव्यापी लॉक डाऊन वाढतच चालल्याने बेरोजगार झालेले बिहार, उत्तरप्रदेश, राजस्थान मध्यप्रदेश व इतर राज्यातील कामगार बस, रेलवे ही सेवा बंद केल्याने जाता येईना म्हणून हतबल झाले होते अशात ऐक त्यांच्या साठी आनंदाची बातमी आली सरकारने काही अटी व शर्तीवर परतीचा मार्ग खुला केला. आता आपल्या गावी जाता येईल म्हणून हे कामगार खुश झाले असून कस आणि केव्हा पाठवणार ही चिंता त्यांना सतावत आहे. मुझे मेरे गाँव जाना है, लेकिन साहब ये फार्म कैसे भरना है, पता नही.. जो नबर दिया है, वहां कोई फोन नही उठा रहा है...अशा विवंचनेत शेकडो अशिक्षित कामगार, मजूर आहेत. शनिवारी दिवसभर हे कामगार तहसील कार्यालय व नगर पालिकेत फिरत होते. त्यांना प्रशासनाच्या मार्गदर्शनाची या वेळी गरज आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार आहेत. होटल, रेस्टोरेंट, ढाबे, बार, छोटे मोठे उद्योग धंदे व इतर कँपन्यात हे लोक कामगार म्हणून काम करतात, अचानक कोणतीही पूर्व सूचना न देता देशाचे पंतप्रधान यांनी पहले 23 दिवसाचे नंतर 19 दिवसाचे आणि आता परत 14 दिवसाचे लॉक डाऊन केले. या लॉक डाउन मध्ये कामगारांचे हाल सुरु होते. रोजगार नाही खान्या पिण्याचा प्रश्न, काम करुण जमा केलेली पूंजी संपली. परिवार गावी त्यांची अड़चन आता काय करावे म्हणून हताश झालेल्या कामगाराना सरकारने गावी जाण्यासाठी सोय केली असून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करीत गावी जाण्याची परवानगी दिली आहे. गावी जाता येत या एकाच शब्दाने ते हूरळून गेले असून त्यांना गावी जाण्याची ओढ़ लागली आहे.
Leave a comment