माजलगाव । वार्ताहर
कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांच्या कामावर कुर्हाड कोसळली असून कोणी उपाशीपोटी राहू नये म्हणून सामाजिक संस्था व कार्यकर्ते यांनी धान्य स्वरूपात खिचडी, एक वेळचे जेवण दिले तर आज सेवानिवृत्त शिक्षक रमेशचंद्र कोडगिरकर व सौ लक्ष्मीबाई कोडगिरकर यांनी आपल्या कुटुंबियांना सोबत पाला वर जाऊन पाल ठोकून राहणारे व इतर ठिकाणी राहणार्या गरीब कुटुंबातील व्यक्तीला औषध व इतर गरजासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये असे एकूण पन्नास कुटुंबातील व्यक्तीना एक लाख रुपये चे वाटप केले.
हे सेवानिवृत्त शिक्षक गजानन विद्यालय लउळ येथे शिक्षक होते. मागील अनेक वर्षांपासून ते शारीरिक दृष्टीने अधू झाले असले तरी आज गोर गरिबांना उभारी देण्यासाठी त्यांनी मोठी मदत केली. यापूर्वी ही त्यांनी मागील आठवड्यात गहू व तांदूळचे वाटप गोशाळेच्या माध्यमातून केले. यावेळी सौ. कमलाबाई मुंदडा गोशाळा देवखेडा चे जगदीश चांडक, संतोष बजाज, जुगल किशोर भुतडा,कल्याण गुंजकर, डॉ.दीपक कोडगीर कर, शिवानंद कोडगिरकर, दुर्गदास कोडगिरकर, ज्योती कोडगिरकर, आदित्य बजाज आदी उपस्थित होते.
Leave a comment