माजलगांव । वार्ताहर
दिंद्रुड येथील प्रसिद्ध व्यापारी शंकर स्वामी यांच्या निधनानंतर उत्तरकार्यात निराधारांना एक महिन्याचा किराणा वाटप करत शंकर स्वामी यांच्या मुलांनी आदर्श उपक्रम राबवला आहे.
दिंद्रुड येथील शंकर स्वामी यांचे वृद्धापकाळाने सोमवारी निधन झाले. कोव्हिड 19 च्या पार्श्वभूमीवर संचारबंदीमुळे कुठलाही धार्मिक विधीसाठी अनावश्यक खर्च करता साधारण पद्धतीने शंकर स्वामी यांचे उत्तरकार्य विधी उरकण्यात आले. या प्रसंगी अनेक एकल, विधवा, निराधार महिलांना जेमतेम एक महिना पुरेसे किराणा सामान वाटप करण्यात आला. वैजनाथ स्वामी व सोमेश्वर स्वामी यांनी अनावश्यक खर्चाला फाटा देत गरजूंना थेट त्यांच्या दारात मदत पोच केली. दिंद्रुड येथील सामाजिक कार्यकर्ते अतुल चव्हाण, राजेश स्वामी, अशोक चव्हाण, दर्शन स्वामी यांनी ही मदत पोहच केली. हातावर पोट असणार्या व संचारबंदी मुळे उपासमारीची वेळ ओढवलेल्या अनेक कुटुंबांना मदत करत स्वामी कुटुंबाने आदर्शवत उपक्रम राबविला आहे.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment