माजलगाव । वार्ताहर
तालुक्यातील पात्रुड येथे मोठ्या प्रमाणात मोल-मंजुरी करून संसाराचा गाडा ओढणारे लोक राहतात. कोरोनाच्या पार्शभुमिवर लाकडाऊन पाळण्यात येत असल्याने अनेकांच्या उदरनिर्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने या गावातील एक’नाथ’ मस्के हे पुढे सरसावले आसुन आपल्या नौकरीच्या पगारातून जमा केलेले एक लाख रूपये संसाराचा गाडा चालवण्यासाठी 200 गरजुंना 500 रूपये प्रमाणे वाटप करून आधार ठरला आहे.
माजलगाव येथील सुंदरराव सोळंके महाविद्यालयात प्रयोगशाळा सहाय्यक असणारे एकनाथ मस्के हे पाञुड येथील रहिवाशी आहेत. मस्के हे मोल मंजुरी करणार्या सामान्य कुटूंबातील. त्यामुळे त्यांना उपासमारीचा मोठा परिचय आहे. पाञुड हे गाव तालुक्यातील माजलगाव शहरानंतरचे सर्वात मोठे गाव. गावात 80 टक्यावर कुटूंब हे मोल मंजुरी करणारेच, त्यात कोरोनाने जगभरात थैमान घातले असल्याने आपल्या देशात ही लाकडाऊन पाळण्याथा आला आहे. याची मोठी झळ पाञुड येथील मजुरांन बसत असल्याने गरीबीची जाण असणारे एक’नाथ’ मस्के यांनी त्यांच्या पगारातील बचत केलेल्या एक लाख रूपये 200 गरजवंत कुटूंबाना 500 रूपये प्रत्येकी मदत म्हणून देत सामाजिक दायित्व जपत आधार ठरले आहेत.
मी कर्तव्य पार पाडले -एकनाथ मस्के
आज लाकडाऊन मुळे हातावरा पोट असणारांची परवड होत आहे. अशा कुटूंबांना मदतीची गरज आहे. मी या यातना भोगलेल्या आहेत, याच जाणिवेतून मी कर्तव्य पार पाडले. समाजातील ईतरांनी आपृल्या भागातील गरजवंताच्या मदतीचा हात द्यावा, असे एकनाथ मस्के यांनी दैनिक लोकप्रश्नशी बोलतांना मत व्यक्त केले.
---------
Leave a comment