किल्लेधारूर । वार्ताहर
धारूर व केज तालुक्यातील तुर शासकीय खरेदी केंद्राचा प्रत्यक्ष खरेदीस आज रविवारी पासून संचालक व शेतकरी यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली.
तालुक्यातील तुर व हरभरा उत्पादक शेतकर्यांनी आपल्या पीकाची यापुर्वीच खरेदी विक्री संघाकडे नोंदणी केलेली आहे. यात केज व धारूर दोन तालुक्यातील सहा हजार तीनशे तुर उत्पादक व तीन हजार पाचशे हरभरा उत्पादक शेतकर्यांनी नोंदणी केली आहे. या खरेदी केंद्रावर भारतीय अन्न महामंडळाकडुन शासकीय तुर व हरभरा खरेदी केली जाणार आहे. असोला रोडवरील ऑईल मिलवर आज तुर खरेदीस सुरुवात करण्यात आली. खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या मालाची ग्रेडींग करण्यासाठी ग्रेडर उपलब्ध नसल्याने त्यातच कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन जाहिर केल्याने या खरेदीस उशिर झाला होता. संचालक नितीन कांबळे यांच्या हस्ते तूर खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी रामदास काकडे, राधाकीसान शिनगारे, विष्णु कोमटवार, रमेश चव्हाण, खरेदी विक्री संघाचे सर्व कर्मचारी व शेतकरी बांधव उपस्थित होते जिल्हाधिकारी यांच्या सूचनांचे पालन करून सोशल डीस्टंंन्स ठेवून ही तूर खेरिदी होणार असल्याचे एस एन चोले यांनी सांगितले.
Leave a comment