माजलगाव । वार्ताहर
देशांवर आलेल्या कोरोना विषाणूचे संकट फार मोठे असून ते सावरण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने मोठया हिमतीने पावले उचलून कार्य सुरू ठेवले आहे. या कार्यात आपलीही समाजाप्रती असलेल्या बांधिलकीपोटी माजलगाव तालुका पतसंस्था फेडरेशनने मुख्यमंत्री सहायता निधीला 1 लाख 11 हजार रुपयांची मदत दिली आहे.
फक्त आर्थिक व्यवहार न करता सामाजिक बांधिलकी व जाण असणार्या अनेक पतसंस्थाचे संघटन म्हणून फेडरेशन नेहमीच काम करत असते, सध्या कोरोना विषाणूचे जागतिक संकट आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये लॉकडाऊन असल्यामुळे, नागरिक व सरकार यांना सर्व स्तरातून सहकार्य होताना दिसत आहे आणि याचाच एक भाग म्हणून, आपणही समाजाचं देण लागतो या भावनेतून पतसंस्थानी पुढे येऊन मुख्यमंत्री सहायता निधीस फुल न फुलांची पाकळी मदत करण्याचा निर्णय घेतला, ही मदत वयक्तिक करण्यापेक्षा सामूहिक करण्याचे सर्व संस्थांनी ठरवले, फेडरेशनच्या सभासद व संचालक असलेल्या माजलगाव तालुक्यातील दि मराठवाडा अर्बन पतसंस्था, महालक्ष्मी अर्बन पतसंस्था, मुक्ताई अर्बन पतसंस्था, तुळजाभवानी नागरी पतसंस्था, संजीवनी ग्रामीण पतसंस्था, दिंद्रुड ज्ञानेश्वरी अर्बन पतसंस्था, संत कबीर बहुराजीय पतसंस्था, योगेश्वरी अर्बन पतसंस्था, जगद्गुरू अर्बन पतसंस्था, माजलगाव पीपल्स अर्बन पतसंस्था, सिंदफणा महिला पतसंस्था, साई अर्बन पतसंस्था या संस्थांनी तालुका पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून एकत्र येत वतीने मुख्यमंत्री सहायता निधीला 1 लाख 11 हजार रुपयांचा निधी फेडरेशनच्या खात्यावर एकत्रित जमा करून त्याचा धनादेश येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात फेडरेशनचे अध्यक्ष सतीश सावंत व सचिव संजय सपाटे यांनी शेरखाने यांचेकडे सुपूर्द केला.
Leave a comment