मराठवाडा शिक्षक संघाची मागणी
बीड । वार्ताहर
शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधीची परतावा, नापरतावा तसेच सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचे अंतिम भविष्य निर्वाह निधीची बिले शिक्षकांच्या मागणीनुसार अदा करण्यात यावीत अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाने शासनाकडे केली आहे.
या बाबत मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हा सचिव राजकुमार कदम यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की शासन स्तरावरुन ऑनलाईन बीडीएस ब्लॉक केलेली आहे. त्यामुळे शिक्षकांची भविष्य निर्वाह निधीची परतावा, नापरतावा तसेच सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांची अंतिम भविष्य निर्वाह निधी देयके तयार असूनही कोषागारात टाकता येत नाहीत. त्यामुळे शिक्षकांना भविष्य निर्वाह निधीचे आपले हक्काचे पैसे मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे भविष्य निर्वाह निधीचा बंद केलेला टॅब त्वरीत सुरू करावा व अनेक महीन्या पासून प्रलंबित असलेली भविष्य निर्वाह निधी देयके अदा करावीत अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष पी.एस.घाडगे, सरचिटणीस व्ही.जी.पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
Leave a comment