बीड । वार्ताहर
सध्या कोरोना व्हायरसमुळे सर्वसामान्यांची आर्थिक घडी पूर्णताः विस्कटली आहे. त्यामुळे त्यांच्या जगण्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. या कोरोना संकटाशी मुकाबला करताना शासन व आरबीआय बँकेकडून वेगवेगळ्या उपाय योजना केल्या जात आहेत. ही भयानक परिस्थिती लक्षात घेता, सभासदांच्या हितासाठी नेहमी अग्रेसर असलेल्या नवजिवन पतसंस्थेने अडचणीच्यावेळी सभासदांना आधार देण्यासाठी संस्थेने 1 मे पासून पासून सर्व कर्जावरील व्याजदर हा 2% ने कमी करून 10% करण्याचा निर्णय घेतला आहे. असल्याची माहिती नवजिवन पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीराम बहीर यांनी दिली आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात श्रीराम बहीर यांनी म्हटले आहे की, कोरोना संकटाशी मसामाना करताना राज्य शासनाने काही कठोर पावले उचलली आहेत. शिक्षक बंधुनो आपल्या सर्वांचे सहकार्य संचालक मंडळाचे योग्य अचूक निर्णय आणि कर्तव्यदक्ष कमर्चारी यामुळे संचालक मंडळास जिल्ह्यातील इतर पतसंस्थेपेक्षा सर्वात कमी व्याजदर 10% ठेवणे शक्य झाले आहे. आज रोजी संस्थेकडे आपल्या बांधवांचा ठेव स्वरूपात निधी आहे. त्यांची ही गरजेनुरूप मुदत ठेव, आरडी यांची मागणी असते. तातडी कर्ज दैनंदिन मागणी व पुरवठा सुरूच असतो. पैशाची आवक घटते आहे व जावक मात्र नेहमीसारखी सुरुच आहे. पगारातून येणारा पैसा मोठ्या प्रमाणात गोठला गेला तर आपल्या सुरळीत चाललेल्या व्यवहारावर परिणाम होऊ नये. त्याकरिता जवजिवन पतसंस्था विचार पुर्वक पावले टाकत आहे. संस्थेने सभासदांना आतापर्यंत सुमारे 28 कोटीपेक्षा जास्त कर्जवाटप केलेले आहे. त्यामुळे संस्थेसमोरही आर्थिक संकट निर्माण होऊ शकते. म्हणून संस्था काळजीपुर्वक निर्णय घेत आहे. संस्था आपल्या सर्वांची आहे. अडचणीच्या काळात सर्वांनी संस्थेला समजून घ्यावे. केंद्रीय मु.अ.यांना विनंती की, पतसंस्थेने पाठवलेल्या यादीप्रमाणेच सर्वांची कपात करावी. पगार झाल्यानंतर यादीमध्ये कोणताही बदल न करता मुळ यादी व धनादेश पतसंस्थेकडे ताबडतोब पाठवावा. असेही आवाहन नवजिवन पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीराम बहीर यांच्यासह संचालक मंडळ यांनी केले आहे.
Leave a comment