आष्टी । वार्ताहर
येथील लेकी-सुनांनी एकत्र येऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीएम केअर फंडास 11 हजार 601 रुपयांचा मदतनिधी दिला आहे. अनेक वर्षांपासून एकमेकींच्या संपर्कात नसलेल्या आष्टीतील लेकी व सुनांना व्हाटसअपच्या माध्यमातून एकत्र येण्याची सोय झाली. नुकतेच आष्टीतील दत्तमंदीर गल्लीतील श्रीदत्त देवस्थानमध्ये दत्तमूर्तीची पुनःप्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला. या निमित्ताने आष्टीतील लेकींनी एकत्र येत दत्त मंदिरात दर्शन घेतले. तसेच कन्या प्रशालेमध्ये स्नेहमेळावा घेऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी गरजू विद्यार्थिनींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याचाही निर्णय घेण्यात आला. याच स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने सामाजिक कार्यात योगदान देण्याचा संकल्प करून लेकी व सुनांचा व्हाटसअप ग्रुप तयार करण्यात आला.
सध्या कोरोनाच्या संकटामुळे सर्वत्र लाकडाऊन आहे. अशा काळात देशावर संकट आलेले असताना वेगवेगळ्या शहरांत असलेल्या लेकी-सुनांनी या संकटसमयी सामाजिकी जबाबदारी म्हणून आर्थिक मदत देण्याचे निश्चित केले. त्यानुसार नुकतेच ग्रुपच्या सदस्यांनी जमविलेले 11 हजार 601 रुपये पीएम केअर फंडास आनलाईन जमा करण्यात आले. या कामी मेधा मुंगीकर, शिवानी मुंगीकर, आशा कुलकर्णी, नियती देशपांडे, मनिषा वैद्य, रंजना राऊतमारे, अंजली कुलकर्णी, सुनिता कुलकर्णी, भावना क्षीरसागर, वंदना होशिंग, अर्चना होशिंग, पौर्णिमा क्षीरसागर, सीमा धर्म, वैशाली जोशी, अपर्णा धर्माधिकारी, सोनी सहस्रबुद्धे, सुजाता क्षीरसागर, वैशाली राजोपाध्ये, मनिषा मेहेर, पूजा देशपांडे, अनिता गांधी, स्वाती देशपांडे, सुरेखा कुलकर्णी, वंदना क्षीरसागर, जयश्री क्षीरसागर, स्वाती जोशी, कल्पना मुंगीकर, वर्षा दुशी, मनीषा दुशी, स्मिता देशपांडे, विजया काटेकर, वंदना कुलकर्णी, सुवर्णा पोतदार, शलाका पोतदार, शुभांगी कुलकर्णी, संगीता गोले, हेमा चव्हाण, वंदना दुशी, मंजुषा दुशी, लक्ष्मी धर्माधिकारी, अनुराधा दुशी, गायत्री पाठक, अश्विनी कुलकर्णी, माधवी देशपांडे, सुरेखा दुशी, संजीवनी दुशी, आशा दुशी, रंजना सहस्रबुद्धे, पल्लवी सहस्रबुद्धे, स्मिता देशपांडे, ऊल्का दुशी, डॉ. सुलोचना चव्हाण, शोभा चव्हाण, अल्का धर्म, वर्षा देशमुख, वंदना सहस्रबुद्धे, सवीता चव्हाण, सुचेता देशपांडे यांनी पुढाकार घेतला.
Leave a comment