आष्टी । वार्ताहर
रात्रीचे दोन वाजण्याची वेळ. अंभोरा चेक पोस्टवर ड्युटी लावलेला सुरक्षा कर्मचारी खुर्चीवर बसून पहारा देत होता. अचानक सळसळण्याचा आवाज कानावर पडला पाहतो तर काय चार ते पाच फुट लांबीचा साप पायाजवळ होता. घाबरलेल्या कर्मचार्याने आणि इतरांनी या सापाला मारले. जर तो त्याच्या दृष्टीक्षेपात पडला नसता वेळ आली होती पण.....आपत्ती निवारणमध्ये काम करत असताना कर्मचार्यांना अनेक दिव्यांचा सामना करावा लागत आहे. सध्या अशाच काही घटनांमधून कर्मचारी जात आहेत. त्यांच्या सुरक्षाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आष्टी तालुक्यातील अंभोरा येथे नगर आष्टीच्या दरम्यान चेक पोस्ट उभारण्यात आले आहे. सुरुवातीला सामान्य असलेल्या चेकपोस्ट वर उसतोडणी कामगारांच्या बीड जिल्ह्यातील आगमनाने ताण पडला. येथे वैद्यकीय चेक करणारी टीम, शिक्षकांची स्वागतिका टीम, शिक्षकांची एस्कॉर्ट टीम आणि राखीव टीम काम करत आहेत. या चेक पोस्ट साठी शेतात मंडप देण्यात आला आहे. शेतात सध्या उष्णतेच्या त्रासामुळे अनेक जमिनीत राहणारे प्राणी रात्रीच्या वेळी बाहेर पडत आहेत. 24 तास ड्युटी करणारे कर्मचारी रात्री या मंडप मध्ये न थांबता हायवे वर येऊन जिथे जागा मिळेल तिथे थांबत आहेत. कर्मचारी अधिक आणि जागा कमी यामुळे या कर्मचार्यांना शेताचा सहारा घ्यावा लागत आहे. अनेक कर्मचारी रात्रीच्या वेळी शेतात झोपतात. मात्र साप पोलीस कर्मचार्याच्या खुर्चीखाली साप निघाल्याने हे कर्मचारी धास्तावले आहेत. याच चेक पोस्ट वर बिबट्या सदृश्य (तरस असावा) प्राण्याने इथ हजेरी लावली असल्याची माहिती येथील कर्मचार्यांनी दिली. राज्य सरकारने आपत्ती निवारण कामात असणार्या कर्मचार्यांना विमा कवच लागू करण्याचा निर्णय घेतला असला तरी ते विमा कवच अजूनही कर्मचार्यांपर्यंत पोहचले नसल्याची माहिती आहे. एकूणच कर्मचारी यांची सुरक्षा वार्यावरच असल्याचे दिसत आहे.
Leave a comment