आतापर्यंत तपासलेले 213 स्वॅब निगेटिव्ह
बीड । वार्ताहर
राज्यशासनाने ऊसतोड मजूरांना त्यांच्या जिल्ह्यात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर 19 एप्रिलपासून रविवार (दि.3) मे पर्यंत 36 हजार 632 मजूर जिल्ह्यात परतले आहेत. दरम्यान या मजूरांना जिल्ह्यात प्रवेश देताना त्यांची संपूर्ण तपासणी चेकपोस्टवर केली जात आहे. दुसरीकडे रविवारपर्यंत जिल्ह्यात तपासलेले सर्वच 213 थ्रोट स्वॅब नमुन्याचे आवाहल कोरोना निगेटिव्ह आलेले आहेत. जिल्हा आरोग्य यंत्रणेने ही माहिती दिली.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बीड जिल्ह्यात सुरूवातीपासूनच खबरदारी घेतली जात आहे. जिल्हा प्रशासनाकडून सर्व विभागांच्या समन्वयांकडून आवश्यक त्या उपाययोजना वेळोवेळी केल्या जात आहे. त्यामुळे बीड जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यात प्रशासनाला यश आलेले आहे. आष्टी तालुक्यातील एक रूग्ण कोरोनाबाधीत आढळला होता परंतू यशस्वी उपचारानंतर तोही बरा होवून घरी परतला आहे. त्यामुळे जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. परजिल्ह्यातून आलेले 31 जण सध्या होम क्वारंटाईन आहेत. तर 121जण संस्थात्मक अलगीकरणमध्ये आहेत.
Leave a comment