,
शेतकऱ्यांच्या भाजीपाला व फळांना भाव ठरवुन देण्याची केली होती मागणी
माजलगाव / वार्ताहर
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांची घावुक खरेदी - विक्री बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना स्पर्धात्मक दरात भाजीपाला व फळे विकण्याची संधी नाही. त्यामुळे गट जो भाव देतील तोच मान्य करावा लागत असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने गटाप्रमाणेच शेतकऱ्यांच्या मालाचा भाव ठरवून देण्यासाठी येथील आ.प्रकाश सोळंके यांनी तहसीलदार यांना पत्र दिले होते. मात्र त्यांच्या पत्राची 10-12 दिवसानंतर दखल न घेता त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवण्यात आली.
संचारबंदी अंतर्गत शिथील करण्यात आलेल्या कालावधीत जीवनावश्यक फळे व भाजीपाला यांचे खरेदी व विक्री करिता माजलगाव शहरात विविध ठिकाणी नगरपरिषदेने निश्चित केलेल्या जागेत नोंदणीकृत शेतकरी बचत गटामार्फत फळे व भाजीपाला विक्री करण्यास तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीने परवाना दिलेला आहे तसेच ग्राहकांना विक्री करावयाच्या फळे व भाजीपाला यांचे दर निश्चित केलेले आहेत या कार्यपद्धतीवर आमदार प्रकाश सोळंके यांनी अनेक आक्षेप तहसीलदार दिलेली यांना दिलेल्या पत्रात नोंदवले आहेत.
या पत्रात म्हटले आहे की, गटातील बहुतांश शेतकरी भाजीपाला उत्पादक असून सर्वसाधारण शेतकरी आहेत व ते दुसऱ्या शेतकऱ्यांकडून अत्यल्प कमी भावात याची खरेदी करत आहेत. यामुळे शेतकर्यांकडुन खरेदी करण्याचे दर निश्चित केलेले नसल्यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होत असुन ते जो भाव ठरवतील तोच भाव शेतकऱ्यांना मान्य करावा लागतो आहे , ज्या गटांना विक्रीचा परवाना दिला आहे अशा गटाकडे ग्राहकांना विक्री करण्याच्या वजन मोजणी काटा तपासणी प्रमाणपत्र नसून ते कायद्याप्रमाणे आवश्यक आहे व गटाकडून ग्राहकांना विक्री केलेल्या मालाची नोंद ठेवणे आवश्यक असून याचे ऑडिट होणे गरजेचे आहे असल्याचे म्हटले होते.
आ.सोळंके यांनी तहसीलदार यांना याबाबत 22 एप्रिल रोजी पत्र देऊनही तहसीलदार यांनी याची साधी दखल देखील घेतली नाही. यामुळे शेतकऱ्यांची गटांकडून लुट होत असल्याने शेतकऱ्यांना आपला भाजीपाला व फळे मातीमोल विक्री करावा लागत असल्याने शेतकऱ्यांचे यात मोठे नुकसान होतांना दिसत आहे.
गटाकडुन शेतकऱ्यांची अडवणुक होत असल्याचे दिसून आलेले नाही. तरी याबाबत कृषी अधिकाऱ्यांना सुचना देण्यात येतील.
--- डॉ. प्रतिभा गोरे , तहसीलदार
Leave a comment