धारुर । वार्ताहर
तालुक्यातील जहाँगीरमोहा व थेटेगव्हाण येथील साठ कुटुंबाना जीवनदिप सेवाभावी संस्थेच्या वतीने जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कोरोना संकटात अनेक ठिकाणी माणुसकीचे दर्शन घडत आहे. देशभर लॉकडाऊन असल्याने गोरगरिब, शेतकरी, मजूर वर्गाच्या कुटूंबियावर उपासमारीची वेळ आली आहे. याकाळात शासनाने प्रत्येकी पाच किलो तांदूळ मोफत दिले तर अनेक संस्थांनी जीवनावश्यक वस्तूंची मदत करताना दिसत आहे. तालुक्यातील जागिरमोहा व थेटेगव्हाण येथील गोरगरीब कुटूंबाना जीवनदीप सेवाभावी संस्थेच्या वतीने 60 कुटूंबांना धान्यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश कोकाटे, संस्थेचे प्रमुख डॉ.बिभिषण पानडवळे, पत्रकार प्रकाश काळे, सहशिक्षक श्रीराम सिकची, विठ्ठल चव्हाण, हरणावळ नारायण आदी उपस्थित होते. सदरील कार्यात राजेभाऊ अंडिल, त्रिंबक माळी, दिलिप पाटिल यांनी विशेष परिश्रम घेतले.
Comments (1)
इतरांच्या बातम्या कॉपी करणे थांबवा
Leave a comment